पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी; अश्वारूढ शिवरायांसह ‘कटिबद्ध जनहिताय’चा संदेश

काशिनाथ शिंदे : पिंपरी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत बोधचिन्हात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असून, नव्या बोधचिन्हाच्या अंतिम नमुन्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नव्या बोधचिन्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा तसेच ‘कटिबद्ध जनहिताय’ हे ब्रीदवाक्य समाविष्ट करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी विचार आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवणारी प्रशासनाची भूमिका या संकल्पनेतून बोधचिन्हाची रचना करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाच्या ठरावानुसार नव्या बोधचिन्हाचा अंतिम नमुना मान्य करण्यात आला आहे. नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामे आणि प्रशासकीय उपक्रमांमध्ये ‘कटिबद्ध जनहिताय’ हा संदेश महापालिकेच्या जनसेवेचे प्रतीक ठरणार आहे.

स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर आता नव्या बोधचिन्हाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आवश्यक आकारमानानुसार हे बोधचिन्ह महापालिका मुख्यालयासह विविध विभागीय कार्यालये आणि महापालिकेच्या इमारतींवर दर्शनी ठिकाणी लावण्यात येणार आहे.

नव्या बोधचिन्हाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकृत कामकाजात आणि विविध कार्यालयांमध्ये हे नवीन बोधचिन्ह झळकणार आहे.

See also  "अण्णाभाऊंच्या विचारांना सलाम... टिळकांच्या राष्ट्रभक्तीला अभिवादन! देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात प्रेरणादायी संयुक्त सोहळा"
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!