पुणे महापालिकेच्या ४४२ सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक

काशिनाथ शिंदे : पुणे

महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या रोजंदारी व खाडे रोजंदारी कामाच्या अंमलबजावणीसंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

विधानभवनातील उपाध्यक्ष कार्यालयाच्या दालनात झालेल्या या बैठकीत पुणे महापालिकेतील तब्बल ४४२ सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांना त्यांच्या हक्काचे काम आणि न्याय मिळावा, तसेच रोजंदारी व खाडे रोजंदारी कामाच्या अंमलबजावणीबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, यावर बैठकीत भर देण्यात आला.

सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत पुणे महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. संबंधित कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याने ४४२ सफाई कामगारांच्या प्रश्नाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

सफाई कामगारांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असून, कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

४४२ सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी झालेल्या या बैठकीमुळे संबंधित कामगारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे

See also  अवैध देशी दारू साठ्यावर गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; १५ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!