कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचा आधार!

राज्यात प्रथमच सानुग्रह अनुदानाचा लाभ; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

काशिनाथ शिंदे

कोल्हापूर, गावोगावी आरोग्यसेवेची धुरा सांभाळताना अपघाती मृत्यू झालेल्या आजरा तालुक्यातील एरंडोळ येथील आशा स्वयंसेविका स्व. दर्शना शिवाजी गोवेकर यांच्या कुटुंबाच्या मदतीला राज्य शासन धावून आले आहे. कर्तव्य बजावताना झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या मदतीचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

स्व. दर्शना गोवेकर यांची ग्रामपंचायतीमार्फत आशा स्वयंसेविका म्हणून निवड झाली होती. त्यांनी २२ एप्रिल २०११ ते २६ जुलै २०२४ या कालावधीत सेवा बजावली. कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातानंतर त्यांचे २९ ऑगस्ट २०२४ रोजी दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुली असा परिवार आहे.

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या सेवेला आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने २६ ऑगस्ट २०२४ रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कर्तव्य बजावताना आशा स्वयंसेविका किंवा गटप्रवर्तक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली.

या निर्णयानंतर या योजनेचा लाभ मिळालेले स्व. दर्शना गोवेकर यांचे कुटुंब राज्यातील पहिले लाभार्थी ठरले आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आरोग्य विभागाने शासनाकडे सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव पाठविला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर १० लाख रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना देण्यात आला.

गावपातळीवरील आरोग्यव्यवस्थेची महत्त्वाची कडी

ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा म्हणून आशा स्वयंसेविका काम करतात. माता व बाल आरोग्य, लसीकरण, विविध आरोग्य मोहिमा तसेच नागरिकांना शासकीय आरोग्यसेवांशी जोडण्याची जबाबदारी त्या गावपातळीवर पार पाडतात. त्यांच्या सेवेला संरक्षण देण्याच्या दृष्टीने शासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

See also  आधी कृती, मग प्रसिद्धी! नवरात्र बंदोबस्तातील सेवेसाठी संस्कार प्रतिष्ठानचा पुणे पोलिसांकडून गौरव

दर्शना गोवेकर यांच्या दुर्दैवी निधनानंतर शासनाने त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत दिलेली १० लाखांची मदत ही कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे.

यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळाचे डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. दीपक मेंढेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी बर्गे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर