सहाव्या वर्षी रुद्रची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये दमदार नोंद!

कार्स’ चित्रपटाने लावली आवड; दोन वर्षांत १०२ लघु कारचा अनोखा संग्रह

काशिनाथ शिंदे

रावेत : वय अवघे सहा वर्षे… हातात खेळणी असण्याच्या वयात कारच्या दुनियेत रमलेल्या रावेतमधील रुद्र हृषीकेश सोनार याने आपल्या अनोख्या छंदातून थेट ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळविले आहे. वयाच्या चौथ्या वर्षी ‘कार्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर रुद्रला लघु कार गोळा करण्याची आवड निर्माण झाली. अवघ्या दोन वर्षांत त्याने विविध कंपन्या व प्रकारच्या ७९ लघु कारचा संग्रह केला आणि या कामगिरीची ६ ऑगस्ट २०२६ रोजी नोंद झाली. त्याला १३ ऑगस्ट रोजी ‘आयबीआर अचिव्हर’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

 

रुद्रच्या कार संग्रहाची सुरुवात २०२४ मध्ये झाली. पालकांनी त्याला ‘हॉट व्हील्स’ कंपनीची पांढऱ्या रंगाची शेव्हरोले ही पहिली लघु कार घेऊन दिली. त्यानंतर कारच्या वेगवेगळ्या मॉडेल्स, कंपन्या आणि प्रकारांविषयी त्याची उत्सुकता वाढत गेली. एकामागून एक लघु कार त्याच्या संग्रहात जमा होत गेल्या. रेकॉर्डसाठी नोंदणी करताना त्याच्याकडे ७९ कार होत्या. मात्र, रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्यानंतरही त्याचा हा छंद थांबलेला नाही. सध्या त्याच्या संग्रहात तब्बल १०२ लघु कार आहेत.

 

कारचा संग्रहच नव्हे, माहितीचाही खजिना!

 

रुद्र केवळ लघु कार जमा करत नाही, तर प्रत्येक कारविषयीची माहिती जाणून घेण्यातही त्याला विशेष रस आहे. कारचा निर्माता, मॉडेल, प्रकार, वैशिष्ट्ये आणि इतर माहिती तो उत्सुकतेने समजून घेतो. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या दोन कार संग्रहकांच्या मेळाव्यांमध्येही त्याने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या दोन्ही मेळाव्यांमध्ये रुद्र हा सर्वांत कमी वयाचा कार संग्रहक ठरला.

 

त्याच्या या छंदाला पालक हृषीकेश आणि सोनम सोनार यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन मिळत आहे. कारची माहिती समजून घेणे, संग्रहाची निगा राखणे आणि कार व्यवस्थित ठेवण्याची सवय त्यांनी रुद्रला लावली आहे. त्याचबरोबर अभ्यास आणि छंद यांचा योग्य समतोल राखण्यावरही पालकांचा भर आहे.

See also  केंद्रप्रमुखपदी निवड झालेल्या ज्योती दवणे यांचा मानवाधिकार संघटनेतर्फे सन्मान

 

शाळेकडूनही कौतुकाची थाप

 

रुद्र सध्या रावेत येथील सिटी प्राइड स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिक्षण घेत आहे. त्याच्या या अनोख्या छंदाची आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मधील कामगिरीची शाळेच्या प्राचार्या सुमेधा फडके, शिक्षिका तसेच संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी यांनी कौतुक केले आहे.

 

“अभ्यास आणि छंद या दोन्हींमध्ये योग्य समतोल राखणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. रुद्रच्या कार संग्रहाच्या छंदाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतलेली दखल हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पुढेही त्याने आनंदाने शिकत आणि आपला छंद जोपासत राहावे, अशी आमची इच्छा आहे.”

हृषीकेश आणि सोनम सोनार, रुद्रचे पालक

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!