पुण्यात घुमणार ५ हजार ढोल-ताशांचा निनाद; हिंदुध्वजासह दुहेरी विश्वविक्रमाचा संकल्प!

 

पुणे : आपल्या भागाचे नाव जागतिक विश्वविक्रमाच्या पटलावर नेण्याच्या उद्देशाने पुण्यात भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ५ हजार ढोल-ताशा वादकांचा सहभाग राहणार असून, पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याचवेळी ८२८ मीटर लांबीचा हिंदुध्वज साकारून तो विश्वविक्रमाच्या दिशेने नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे हा उपक्रम दुहेरी विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

या उपक्रमासाठी शहरातील सुमारे १०८ढोल-ताशापथकांपैकी ६० ते ७० पथकांचा सहभाग राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील सुमारे ५० पथकांसह राज्यातील विविध भागांतील पथके, तसेच कर्नाटक, दुबई आणि इतर ठिकाणांहूनही पथके सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या उपक्रमाला परिसरातील सोसायट्यांमधील सर्व रहिवाशांचा सहभाग राहणार असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील. भारत आणि हिंदुध्वजाची संकल्पना जगासमोर नेणे, तसेच भारतीय पारंपरिक ढोल-ताशा वादनाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

८२८ मीटरचा हिंदुध्वज ठरणार आकर्षण

उपक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे ८२८ मीटर लांबीचा हिंदुध्वज. या ध्वजाची मुहूर्तमेढच विश्वविक्रमाच्या दिशेने करण्याचा प्रयत्न आहे. हा ध्वज ३६५ दिवस फडकत राहावा, अशी नागरिकांची भावना असून, त्यासाठी समिती आणि अनेक स्वयंसेवकांकडून नियोजन सुरू आहे.

या उपक्रमासाठी पीएमआरडीए आणि महापालिकेच्या वतीने स्मारक उभारण्यात आले आहे. आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या असून, काही परवानग्यांची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नसल्याचा दावा

स्मारकाच्या आजूबाजूचा परिसर मोकळा असल्याने ढोल-ताशांच्या वादनामुळे नागरिकांना किंवा परिसरातील रहिवाशांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. ढोल-ताशा पथकांच्या उभे राहण्यासाठी बॅरिकेडिंगचे काम प्रगतीपथावर आहे.

See also  शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील खरे शिल्पकार – युवासेना शहर संघटक निलेश हाके

वादक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्ताची मागणी

सध्या महापालिकेचे तीन सुरक्षारक्षक स्मारकाच्या ठिकाणी तैनात आहेत. मात्र, काम सुरू असल्यामुळे अद्याप विद्युत व्यवस्था पूर्ण झालेली नाही. भविष्यात या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

भारत पूर्ण झाल्यानंतर पोलिस सुरक्षा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

दुहेरी विश्वविक्रमासाठी नागरिकांना आवाहन

ढोल-ताशा वादनाच्या मानवंदनेसाठी नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. त्याचप्रमाणे आता प्रस्तावित दुहेरी विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद, हजारो वादकांचा सहभाग आणि ८२८ मीटरच्या हिंदुध्वजाची उभारणी यामुळे हा उपक्रम पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय लिहिण्याच्या तयारीत आहे.

  • Related Posts

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    एसबीपीआयएममध्ये ‘आरंभ’ कार्यक्रमांतर्गत चर्चासत्र संपन्न काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : “मानव संसाधन आणि मनुष्यबळ विकास हे क्षेत्र लोक आणि संस्कृतीशी संबंधित आहे. मानव संसाधन म्हणजे…

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी