शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील खरे शिल्पकार – युवासेना शहर संघटक निलेश हाके

स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये युवासेना-शिवसेनेच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा

काशिनाथ शिंदे: पिंपरी

दापोडी–फुगेवाडी : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देत संस्कारक्षम पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील खरे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी केले.

 

शिक्षक दिनाचे औचित्य साधून युवासेना-शिवसेना दापोडी–फुगेवाडीच्या वतीने स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 

कार्यक्रमास महाविद्यालयाचे मा. प्राचार्य वाय. जी. कांबळे, जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे, असिस्टंट सेक्रेटरी प्रा. प्रदीप नागवडे, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. मेजर किशोर पाटील यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना निलेश हाके म्हणाले, “शिक्षक हे देशाचे भविष्य घडविणारे खरे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्याचे काम शिक्षक करतात. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, परिश्रम आणि संस्कारांचा मोठा वाटा असतो. शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.”

 

युवासेना-शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे महाविद्यालयातील शिक्षकांनी कौतुक केले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे आयोजन युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवासेना-शिवसेना दापोडी–फुगेवाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

See also  "गळ्यात तुकाराम मुंढेंचा फोटो, ओठांवर एकच हाक... 'आधी मुंढे असते, तर कॅन्सर झाला नसता!'; आषाढी वारीतील भावूक क्षण चर्चेचा विषय"
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!