अभिजात मराठी भाषा सप्ताहात नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

काशिनाथ शिंदे

पिंपरी ज्येष्ठ सिनेअभिनेते, रंगकर्मी आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

नाना पाटेकर यांचे गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गोवा येथे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि एकूणच कलाक्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, गझलगायक आशिष मुजुमदार, ग्रंथालय प्रमुख प्रतिभा मुनावत, ग्रंथपाल राजू मोहन, प्रवीण चाबुकस्वार, वर्षा जाधव, निदेशक रवींद्र ओव्हाळ, योगिता कोठावडे, बबिता गावंडे, व्ही. आर. कुंभार, शिक्षक गणेश लिंगडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

मराठी रंगभूमीवरून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटविला. विविधांगी भूमिका, संवादफेक आणि वास्तववादी अभिनयशैलीमुळे त्यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या उल्लेखनीय कलात्मक योगदानासाठी त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कलाक्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना हातभार लावला. मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीशी असलेले त्यांचे नातेही कायम जिवंत राहिले.

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने नाना पाटेकर यांच्या कलात्मक आणि सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असून, त्यांच्या अजरामर कलाकृती आणि अभिनयाच्या माध्यमातून ते रसिकांच्या स्मरणात कायम राहतील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

See also  ऑनलाईन सेवा कर भरण्यास झोपडपट्टीवासीयांचा मोठा प्रतिसाद
  • Related Posts

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    ५ कामांच्या करारासाठी लाचेची मागणी; १९ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद…

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न