पितृपक्षातील अन्नदानातून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा सेवाभावी उपक्रम

देहूतील ५५ वारकरी विद्यार्थ्यांना ३० हजारांचे जीवनावश्यक साहित्य; ५ हजारांची आर्थिक मदत

काशिनाथ शिंदे

चिंचवड : पितृपक्षातील अन्नदानाचे महत्त्व जपत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने श्रीक्षेत्र देहू येथे सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांना सुमारे ३० हजार रुपये किमतीचे जीवनावश्यक साहित्य आणि ५ हजार रुपयांची रोख आर्थिक मदत देण्यात आली. रोटरी क्लबचे सदस्य, त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘आनंदवारी २०२६’ या समूहाच्या उपक्रमातून शिल्लक राहिलेली सुमारे १० हजार ५०० रुपयांची रक्कमही विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी देण्यात आली. सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्य करणाऱ्या आनंदवारीच्या सदस्यांनी शिल्लक निधीचा विनियोग वारकरी विद्यार्थ्यांच्या गरजांसाठी करून सामाजिक बांधिलकी जपली.

पितृपक्षातील अमावस्येच्या दिवशी संस्थेत जाऊन हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक गणेश महाराज चंदेरे यांच्याकडे गहू, तांदूळ, शेंगदाणे, साबण, साखर यांसह विविध जीवनावश्यक वस्तू आणि रोख आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रोटेरियन अमित औटी, माजी अध्यक्ष रोटेरियन गोविंद जगदाळे, माजी सचिव रोटेरियन वसंत ढवळे, रोटेरियन जयश्री भामरे, वसंत भामरे सर आणि हरिभक्त परायण अर्जुन महाराज जाधव उपस्थित होते.

यावेळी हरिभक्त परायण गोविंद जगदाळे सर यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांना यापुढेही शैक्षणिक मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली. तसेच संस्थेच्या बांधकामासाठी रोटरी क्लबच्या वतीने सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष अमित औटी यांनी केले.

सेवेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश

‘सेवा हीच साधना आणि अन्नदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारकरी विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजांसाठी मोलाची मदत मिळाली. आनंदवारी २०२६ मधील शिल्लक निधीचा विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी केलेला विनियोग आणि रोटरी क्लबचा पुढाकार यांमधून सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देण्यात आला. धार्मिक परंपरेला सेवाभावाची जोड देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

See also  बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात
  • Related Posts

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!