व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करावा! – डॉ. कीर्ती धारवाडकर

एसबीपीआयएममध्ये राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंज ‘मीमांसा २०२६’चा दिमाखदार समारोप; विजेत्यांना २० हजारांपर्यंतची पारितोषिके

काशिनाथ शिंदे

पिंपरी : कॉर्पोरेट विश्वात प्रवेश करण्यापूर्वी तरुण व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. कोणत्याही समस्येचे योग्य निराकरण शोधण्यासाठी सखोल विचार, अचूक निरीक्षण आणि तर्कशुद्ध विश्लेषण महत्त्वाचे ठरते. प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करताना ‘का, केव्हा, काय, कुठे आणि कोणासाठी’ या पाच प्रश्नांचा विचार केल्यास निरीक्षणशक्ती विकसित होण्यास मदत होते, असे मार्गदर्शन एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘मीमांसा २०२६’ या व्यावसायिक प्रकरण विश्लेषण स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

चार राज्यांतील ४८ संघांचा सहभाग

‘मीमांसा २०२६’च्या पहिल्या ऑनलाइन फेरीत चार राज्यांतील १८ शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४८ संघांनी सहभाग घेतला होता. या फेरीतील कामगिरीच्या आधारे अंतिम फेरीसाठी १२ संघांची निवड करण्यात आली. पुणे, बेंगळुरू, धुळे आणि संगमनेर येथील स्पर्धकांनी अंतिम फेरीत आपले कौशल्य सादर केले.

भारत फोर्जचे माजी संचालक डॉ. संतोष भावे, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे यांच्यासह उद्योग व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. अंतर्गत तज्ज्ञ समितीत एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर आणि संशोधन विभागप्रमुख डॉ. भूषण परदेशी यांचा समावेश होता.

तर्कशुद्ध विश्लेषणातून विद्यार्थ्यांनी दाखवले कौशल्य

अंतिम फेरीत सहभागी संघांनी विविध व्यावसायिक समस्यांवरील प्रकल्प सादर केले. विश्लेषणात्मक विचार, तर्कशुद्ध मांडणी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी तज्ज्ञांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कॉर्पोरेट नेतृत्व, मानव संसाधन, वित्त, विपणन आणि उच्च शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील समस्यांचे विश्लेषण करताना व्यावहारिक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले.

See also  चिखलीत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; एमडीसह चार वाहने-मोबाईल जप्त, चौघे गजाआड

या कार्यक्रमात ‘मार्केटिंग ३६०’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

‘मीमांसा २०२६’चे विजेते

स्पर्धेत इंदिरा युनिव्हर्सिटीच्या कनक सांगळे आणि लक्ष धनानी यांनी प्रथम क्रमांक पटकावत २० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. एसव्हीकेएम, एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटी, धुळे येथील कृष्णा भवनानी आणि शिवानी ओझा यांनी द्वितीय क्रमांकासह १५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. ॲमिटी ग्लोबल बिझनेस स्कूलच्या प्रणीत कुलकर्णी आणि मधुरम धनक यांनी तृतीय क्रमांक मिळवत १० हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.

विजेत्या संघांना धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अन्य सहभागी संघांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आयोजनात डॉ. संजय गायकवाड, डॉ. पद्मलोचन बिसोयी, डॉ. विशाल वाघ आणि डॉ. इराम अन्सारी यांनी सहभाग घेतला. डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी स्वागत केले, तर विद्यार्थिनी आर्या सरदेशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर