स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर क्षेत्रातील संधींचा शोध घ्या!

संतोष खैरनार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; ‘टेडएक्स – पीसीयू २०२६’ उत्साहात संपन्न

काशिनाथ शिंदे

 

पिंपरी-चिंचवड : नव्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जिज्ञासा, धैर्य, शिस्त आणि सातत्यपूर्ण विचारमंथन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रचलित चौकटींच्या पलीकडे जाऊन विचार करावा. स्वच्छ ऊर्जा आणि सेमीकंडक्टर यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांतील संधी ओळखून त्यांचा शोध घ्यावा, असे आवाहन आयनॉक्स विंडचे अध्यक्ष संतोष खैरनार यांनी केले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी-चिंचवड विद्यापीठात आयोजित ‘टेडएक्स – पीसीयू २०२६’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सामाजिक परिवर्तन अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

नामवंत मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमासाठी पीसीयूचे कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर व नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सहभागी वक्ते व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कार्यक्रमात पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपसंचालक हृषिकेश धनाडे, पीसीयूच्या नवोन्मेष, उद्यमविकास आणि उद्योग संबंध विभागाचे संचालक डॉ. प्रणव चरखा, विद्यार्थी विकास व कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. अंजू बाला, कॅपजेमिनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी व कार्यकारी उपाध्यक्ष मुकेश जैन, कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शक सागर बाबर, मराठी विनोदी कलाकार सौरभ भोसले, ग्लोबल लीन चेंज एजंट आणि चेंज हॅकर सारिका खारबंदा, मारवाडी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल त्रिवेदी, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर, वरिष्ठ कृत्रिम बुद्धिमत्ता आर्किटेक्ट आरशद देवानी, मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ज्ञ पुलकित हांडा आणि भारतीय लष्कराचे माजी अधिकारी चिन्मय महाले यांनी विविध विषयांवर विचार मांडले.

See also  किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मिळणार नवी दिशा

पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई म्हणाले की, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाने प्रथमच ‘टेडएक्स’चे आयोजन केले. या व्यासपीठावर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, नवोन्मेषक आणि शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता विकसित करण्यासाठी अशा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कार्यक्रमांचा मोठा उपयोग होईल.

पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून शिकण्याच्या विविध संधी विद्यापीठ उपलब्ध करून देते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवे विचार समजून घेता येतात, तसेच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन विकसित होतो.

उद्योग, तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण विचार आणि सामाजिक परिवर्तन यांची सांगड घालणाऱ्या ‘टेडएक्स – पीसीयू २०२६’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर