शॉर्टसर्किटने पेटल्या दोन इलेक्ट्रिक दुचाकी; अग्निशामक दलाच्या धाडसी कारवाईने तीन कुटुंबांचे प्राण वाचले!

काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड

पिंपरी : चिंचवडे नगर परिसरातील स्वामी समर्थ कॉलनी येथे शॉर्टसर्किटमुळे दोन इलेक्ट्रिक दुचाकींना भीषण आग लागून एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की तिचे लोळ तळमजल्यापासून थेट दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले. या घटनेत इमारतीतील तीन कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने धाडसी बचावकार्य करून मोठी जीवितहानी टाळली. स्थानिक नागरिकांनीही या बचाव मोहिमेत मोलाची मदत केली.

या घटनेनंतर नगरसेवक शेखर बबनराव चिंचवडे यांनी अग्निशामक दलाच्या जवानांचे आभार मानत चिंचवडे नगर, वाल्हेकरवाडी आणि शिवनगरी परिसरातील अरुंद रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले. या भागातील अनेक कॉलन्यांमध्ये रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या तसेच रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यास अडथळे निर्माण होतात. भविष्यात अशा परिस्थितीत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचा इशारा त्यांनी दिला.

नागरिकांनी आपल्या वाहनांचे पार्किंग रस्त्यावर न करता स्वतःच्या पार्किंगमध्येच करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे शहरातील अरुंद रस्ते आणि वसाहती लक्षात घेऊन लहान आकाराच्या अग्निशामक गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. अशा वाहनांमुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाला घटनास्थळी त्वरित पोहोचून प्रभावी मदत करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

See also  औद्योगिक रस्त्यांवर खासगी बसेसचा ‘कब्जा’; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण!
  • Related Posts

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    पुण्यात प्रशासनाच्या कारवाईचे टीना शर्मा घेवारे यांच्याकडून स्वागत; संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम राबविण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे/पिंपरी: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमधील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!