‘सहा विद्यार्थ्यांना न्याय द्या; बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलवर कठोर कारवाई करा’ — जिल्हाधिकाऱ्यांकडे ह्यूमन राईट असोसिएशनची मागणी

काशिनाथ शिंदे : सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमुळे बारावीच्या सहा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान झाल्याचा आरोप करत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

संघटनेच्या वतीने शाळा व्यवस्थापनावर शिक्षणाच्या नावाखाली खोटी आश्वासने देणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे तसेच सहा विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढावे, अशी मागणी करण्यात आली.

यापूर्वीही ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने देण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पंचायत समिती कणकवलीच्या सभेत झालेल्या चर्चेनुसार संबंधित शाळेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला असून शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी अहवालात नमूद केले आहे.

अहवाल असूनही अद्याप विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत कोणताही ठोस मार्ग काढण्यात आलेला नसल्याचा आरोप संघटनेने केला. तसेच संस्थाचालकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ती नाकारण्यात आल्याचाही दावा करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शाळेच्या कथित मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या भेटीदरम्यान राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर तसेच पालक किशोर ठाकरे, कालिदास परब, सावंत, देवळेकर आदी उपस्थित होते.

See also  स्मार्ट मीटरला हात लावणे पडले महागात!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!