धक्कादायक आरोप! कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक; बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनोद धुमाळ यांची मागणी

काशिनाथ शिंदे : पिंपरी

भोसरी येथील कौटुंबिक मिळकतीच्या विकास व्यवहारात आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक कुणाल दिलीप चोरडिया यांच्याविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी विनोद अनंता धुमाळ यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

धुमाळ यांनी सांगितले की, दि. २२ डिसेंबर २००६ रोजी वडील दिलीप मोतीलाल चोरडिया, मुलगा कुणाल दिलीप चोरडिया आणि मध्यस्थ प्रफुल्ल इनामदार यांच्या उपस्थितीत झालेल्या व्यवहारानुसार कुलमुखत्यारपत्र (दस्त क्र. १०३९७/२००६) आणि विकसन करारनामा (दस्त क्र. १०३९६/२००६) हवेली क्रमांक १७ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कायदेशीररीत्या नोंदविण्यात आला होता. या करारानुसार विकासाच्या मोबदल्यात तळमजल्यावरील एक व्यावसायिक गाळा आणि ६५० चौरस फुटांचा सुपर बिल्ट-अप फ्लॅट चार वर्षांच्या आत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

या आश्वासनावर विश्वास ठेवून कुटुंबाने मिळकत विकासासाठी दिली. मात्र, जवळपास २० वर्षे उलटूनही विकासकाम सुरू झाले नसून करारातील कोणतीही अट पूर्ण करण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप धुमाळ यांनी केला.

मोबदला किंवा मिळकत परत मिळावी, अशी मागणी केल्यानंतर कुणाल चोरडिया आणि प्रफुल्ल इनामदार यांनी धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवीगाळ करून शर्टाची कॉलर पकडत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची, पोलिसांकडून कोणतीही कारवाई होणार नसल्याची आणि “मोठ्या लोकांशी संबंध आहेत” असे सांगत दबाव आणण्यात आल्याचा गंभीर आरोप धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असूनही अद्याप संबंधितांविरोधात अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सामान्य नागरिकाला न्यायासाठी वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही चिंताजनक बाब असल्याचे सांगत प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

See also  अमेरिका, रशिया, केनियातील शिष्टमंडळाचा पीसीईटीमध्ये शैक्षणिक दौरा

“माझी कोणाशीही वैयक्तिक वैरभावना नाही. मात्र, माझ्या कुटुंबाची फसवणूक झाली असून आम्हाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे. व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि तक्रारी पोलिसांकडे सादर करण्यात आल्या आहेत. न्याय न मिळाल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे दाद मागण्याबरोबरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही विनोद धुमाळ यांनी यावेळी दिला.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!