सोलापुरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा भंडाफोड; सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारीसह 8 जण गजाआड!

काशिनाथ शिंदे : सोलापूर

सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सोलापूरच्या शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांसह एकूण आठ जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलीस आयुक्तालयात गुन्हा क्रमांक 554/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3), 338, 340(2), 233, 235, 3(5) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात आरोपींनी बनावट आधारकार्ड तयार करून संबंधित व्यक्तींना दिव्यांग असल्याचे खोटे कागदपत्रांच्या आधारे UDID ऑनलाइन प्रणालीवर अर्ज करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटकेतील आरोपींमध्ये अहमदनगर येथील एका शासकीय कर्मचाऱ्यासह सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

पोलीस तपासात 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत सिव्हिल हॉस्पिटलमधून तब्बल 3,714 दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापैकी संशयास्पद प्रमाणपत्रांची सखोल चौकशी सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता तपासली जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार व पोलीस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

See also  मोशी कचरा डेपो मृत्यू प्रकरण तापलं! दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!