ठाणे गुन्हे शाखा (घटक-१) ची धडक कारवाई; सापळा रचून आरोपींना पकडले, ₹१० लाखांची रोकड जप्त

काशिनाथ शिंदे : ठाणे

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा (घटक-१) ने खंडणीच्या गंभीर गुन्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल ₹८ कोटींच्या खंडणीप्रकरणी तीन आरोपींना ₹१० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ₹१० लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून, या प्रकरणामुळे ठाणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडे खंडणीसंदर्भात माहिती प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी खंडणीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम स्वीकारण्यासाठी आले असता पोलिसांनी क्षणार्धात कारवाई करत तिघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याकडील ₹१० लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या प्रकरणी कलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या खंडणी रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीविरोधात ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत गुन्हेगारांविरोधात अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

See also  कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!