कर्जाच्या वादातून थेट फॉर्च्युनर लंपास! निगडी पोलिसांत गुन्हा

काशिनाथ शिंदे : चिंचवड

थरमॅक्स चौक, संभाजीनगर येथील श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या ताब्यात असलेली सुमारे ₹56 लाख किमतीची टोयोटा फॉर्च्युनर परवानगीशिवाय घेऊन गेल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका व्यावसायिकाविरुद्ध फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बँकिंग वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी संजय वासुदेव जोशी (वय 67, वारजे, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हसमुख राजाराम भाटी (वय 35, माणिकबाग, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 520/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील कलम 303(2), 316, 317(2) आणि 318(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी पिंकी हसमुख भाटी यांनी टोयोटा फॉर्च्युनर खरेदीसाठी श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेकडून ₹42 लाखांचे वाहन कर्ज घेतले होते. मात्र, कर्जासाठी सादर करण्यात आलेली निवासी व व्यावसायिक मालमत्ता त्यांच्या मालकीची नसल्याचे बँकेच्या तपासात उघड झाले. त्यानंतर संबंधित फॉर्च्युनर वाहन सिंहगड पोलिसांच्या मदतीने जप्त करून बँकेच्या ताब्यात देण्यात आले होते.

फिर्यादीनुसार, 26 जून 2025 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता बँकेच्या ताब्यात असलेली एमएच-12-XX-5929 क्रमांकाची फॉर्च्युनर आरोपीने बँकेची कोणतीही परवानगी न घेता, दिशाभूल करून आणि कथित लबाडीच्या हेतूने बँकेसमोरील रस्त्यावरून घेऊन गेला.

या प्रकरणी निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीने वाहन नेमके कशा प्रकारे ताब्यात घेतले, तसेच सध्या ते वाहन कुठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

See also  १५ तास मृत्यूशी झुंज... 'जिवंत आमिष' बनून नरभक्षक वाघिणीला जेरबंद; डॉ. प्रियल चौरागडे यांच्या धाडसाला सलाम!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!