‘आशाताईंच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी आशीर्वाद अन् मोठी जबाबदारी!’

श्रेया घोषाल भावुक; मंगेशकर कुटुंबीयांच्या सांगीतिक वारशाला अभिवादन, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र कॉन्सर्टचे आश्वासन

काशिनाथ शिंदे | चिंचवड

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने मिळणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारताना प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल भावुक झाल्या. “आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत मोठा सन्मान आहे; मात्र त्याहूनही मोठी जबाबदारी आहे. लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांच्या काळात जन्माला येणे, हेच आपले भाग्य आहे,” अशा शब्दांत घोषाल यांनी मंगेशकर कुटुंबीयांच्या सांगीतिक योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ वा आशा भोसले पुरस्कार २०२६ चिंचवड येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आमदार अमित गोरखे, कृष्णकुमार गोयल, भाऊसाहेब भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते श्रेया घोषाल यांचा गौरव करण्यात आला.

‘माझ्या संगीतातील सा देखील या दिग्गजांच्या आवाजातूनच!’

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना श्रेया घोषाल यांनी पुण्यापासून पिंपरी-चिंचवडपर्यंतच्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. “येताना मी लतादीदी, आशाताई आणि हृदयनाथजींची गाणी ऐकत होते. माझ्या संगीतातील ‘सा’ जरी शिकले असेन, तरी तो या दिग्गजांच्या आवाजातूनच,” असे त्या म्हणाल्या.

आशा भोसले यांच्या अष्टपैलू गायकीचा आपल्या कारकिर्दीवर मोठा प्रभाव असल्याचे सांगताना घोषाल म्हणाल्या, “गाण्यात अभिनेत्रीप्रमाणे व्यक्त व्हायचे असेल, तर मी स्वतःमध्ये आशाताई आणण्याचा प्रयत्न करते. त्यांच्याकडून भावभावना आणि गाण्यातील नाट्य शिकले.”

मराठी गाण्याशी पहिल्या आठवणींचा धागा

मराठी संगीताशी असलेले आपले ऋणानुबंध उलगडताना घोषाल यांनी ‘गणराज रंगी नाचतो’ हे आपले पहिले रेकॉर्ड केलेले मराठी गाणे असल्याची आठवण सांगितली. मराठी संगीत आणि महाराष्ट्राशी असलेला जिव्हाळा व्यक्त करत त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र कॉन्सर्ट करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शहरातील संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

See also  घरांच्या हक्कासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचा महापालिकेवर धडक मोर्चा

‘आशा भोसले हा एका पिढीचा आवाज नव्हे, अनेक पिढ्यांचा श्वास!’

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आशा भोसले यांच्या सांगीतिक कर्तृत्वाचा गौरव केला. “आशा भोसले हा एका पिढीचा आवाज नसून अनेक पिढ्यांचा श्वास आहे,” असे ते म्हणाले.

पॉप, भक्तिगीते, भावगीते, गझल, मराठी तसेच गैरफिल्मी संगीत अशा विविध क्षेत्रांत आशाताईंनी केलेले प्रयोग अद्वितीय असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रेया घोषाल यांच्या आवाजात लतादीदींची आठवण येते, असेही त्यांनी सांगितले.

‘भारताची छोटी दीदी’ म्हणून गौरव

आमदार अमित गोरखे यांनी श्रेया घोषाल यांचा ‘भारताची छोटी दीदी’ असा गौरव केला. “चंद्र-सूर्य असेपर्यंत लता, आशा आणि छोट्या दीदींचा आवाज घुमत राहील. श्रेया घोषाल यांचा सन्मान हा पिंपरी-चिंचवडचा बहुमान आहे,” असे गोरखे म्हणाले.

आगामी गणेशोत्सव महोत्सवाचे उद्घाटन श्रेया घोषाल यांच्या हस्ते व्हावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

पारंपरिक पद्धतीने घोषाल यांचा सन्मान

भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्रेया घोषाल यांच्या हस्ते चौघडा वादक पाचंगे यांचा सत्कार करण्यात आला. पंडित हृदयनाथ मंगेशकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आमदार अमित गोरखे, कृष्णकुमार गोयल, भाऊसाहेब भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना शाल, पुष्पगुच्छ, साडी-चोळी, सन्मानचिन्ह देऊन तसेच औक्षण करून पारंपरिक पद्धतीने गौरविण्यात आले.

यावेळी योगेश बहल, गौरव घुले, मृणाल सांकल, दिलीप काटकर, वंदना गांगुर्डे आदी उपस्थित होते

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!