तडीपार असूनही शहरातच ठिय्या! गुन्हे शाखेच्या युनिट-३ने तिघांना उचलले

मोशीतील गंधर्व फेज-२ सोसायटीतून तडीपार आरोपी ताब्यात; चिखलीएमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : तडीपार आदेश झुगारून पिंपरी-चिंचवड शहरात वावरत असलेल्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाला यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोशी येथील गंधर्व फेज-२ सोसायटीत कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.

गुन्हे शाखा युनिट-३चे पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, अजित रुपनवर, सुंदर थोरात आणि स्वप्निल महाले हे पाहिजे, फरारी तसेच तडीपार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत चिखली आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तडीपार आरोपी मोशी परिसरात असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गंधर्व फेज-२ सोसायटी, मोशी येथे सापळा रचून आदर्श उर्फ डपक्या गौतम खंडारे (वय २०, रा. जाधववाडी, चिखली), व्हीपी उर्फ विशाल हनुमंत पोळ (वय २१, रा. जाधववाडी, चिखली) आणि जीके उर्फ गणेश संतोष कोठावळे (वय १९, रा. जाधववाडी, चिखली) या तिघांना ताब्यात घेतले.

यातील आदर्श खंडारे हा चिखली पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील, तर विशाल पोळ आणि गणेश कोठावळे हे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तडीपार आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तिघांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने केली. तडीपार आरोपी शहरात पुन्हा सक्रिय होऊ नयेत, यासाठी गुन्हे शाखेकडून अशा आरोपींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

See also  पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर जीवघेणा हल्ला! गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना हटकल्याने संताप; पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!