कामशेत बाजारपेठेत हरवलेले १५ लाखांचे मंगळसूत्र अवघ्या ३ तासांत शोधून महिलेला केले परत

काशिनाथ शिंदे : मावळ

कामशेत : कामशेत बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलेचे तब्बल १० तोळे वजनाचे आणि सुमारे १५ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हरवले. मात्र, कामशेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून अवघ्या तीन तासांत मंगळसूत्र शोधून संबंधित महिलेला परत मिळवून दिले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोवित्री, ता. मावळ येथील दिपाली भाऊ नेवाळे (वय ३९) या २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास कामशेत बाजारपेठेत खरेदीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांचे १० तोळे वजनाचे, अंदाजे १५ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र पडून गहाळ झाले. त्यांनी तत्काळ कामशेत पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत माहिती दिली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कामशेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आकाश पवार यांनी तातडीने तपास पथकाला मंगळसूत्राचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस हवालदार अमोल तावरे, पोलीस हवालदार कैलास लबडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश थोरात, पोलीस कॉन्स्टेबल अमित पाडळे आणि पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मारकड यांच्या पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता, एका महिलेला गहाळ झालेले मंगळसूत्र सापडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा वापर करून या महिलेचा शोध घेतला. कौशल्यपूर्ण तपासानंतर पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून चौकशी केली.

चौकशीदरम्यान संबंधित महिलेने तिला कामशेत बाजारपेठेत मंगळसूत्र सापडल्याचे सांगितले. त्यानंतर तिने ते मंगळसूत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत १५ लाखांचे मंगळसूत्र हस्तगत करून दिपाली नेवाळे यांना परत केले.

रक्षाबंधनाच्या सणादिवशी हरवलेला एवढ्या मोठ्या किमतीचा दागिना पुन्हा मिळाल्याने दिपाली नेवाळे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. त्यांनी कामशेत पोलिसांच्या तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि संवेदनशीलतेबद्दल आभार व्यक्त केले.

See also  एमडी-अफीम तस्करीवर पोलिसांचा घणाघात; दोघे जेरबंद!

कामशेत पोलिसांच्या या तातडीच्या आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे ‘पोलिस म्हणजे मदतीचा हात’ याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!