विद्यार्थ्यांनी घेतला ‘रस्ता सुरक्षेचा’ वसा!

पर्वतीतील दोन शाळांमध्ये सेफ मोबिलिटी अभियान; विद्यार्थ्यांकडून ‘डेंजरस स्पॉट’चे प्रत्यक्ष ऑडिट

काशिनाथ शिंदे

पुणे,  रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम, सुरक्षित प्रवास आणि रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पर्वती परिसरातील मित्र मंडळ एज्युकेशन सोसायटीचे सरिता विद्यालय आणि सुंदराबाई राठी हायस्कूल येथे ‘सेफ मोबिलिटी’, ‘मोबिलिटी स्नॅपशॉट बाय चिल्ड्रन अँड यंग अडल्ट्स’ तसेच ‘डेंजरस स्पॉट मॉड्यूल’ अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या अभियानात विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच रस्ता सुरक्षेवर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. वाहतुकीचे नियम, वाहतूक चिन्हे, मोटार वाहन कायद्यातील विविध तरतुदी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

‘रुग्णवाहिकेला आधी वाट द्या’चा संदेश

रस्त्यावर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. ‘गिव्ह वे टू द ॲम्ब्युलन्स’ अर्थात रुग्णवाहिकेला सर्वप्रथम रस्ता देण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच हेल्मेट वापरण्याचे महत्त्व, सीट बेल्टचा वापर, ‘नो हॉर्न’ची गरज आणि ‘वॉक ऑन राईट’ यासह सुरक्षित हालचालींच्या विविध नियमांची माहिती देण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

विद्यार्थ्यांकडून ‘डेंजरस स्पॉट’चे प्रत्यक्ष ऑडिट

भविष्यातील रस्ता सुरक्षा ऑडिटर घडविण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना मित्र मंडळ चौक परिसरात प्रत्यक्ष ‘एव्हिडन्स बेस्ड रोड सेफ्टी ऑडिट’ कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

रस्त्यावरील धोकादायक ठिकाणे कशी ओळखायची, वाहतुकीतील अडथळे कोणते, पादचाऱ्यांना कोणत्या अडचणी येतात, वाहतूक चिन्हे व रस्त्याची रचना यांचा अभ्यास कसा करायचा, तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे रस्ता सुरक्षेतील त्रुटी कशा नोंदवायच्या, याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ वाहतूक नियमांचे ज्ञान निर्माण न होता, रस्ते सुरक्षित करण्यासाठी समस्या ओळखून त्यावर उपाय सुचविण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

See also  कुंभमेळा घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार; ५९१ कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात तिघांना अटक

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाचे आयोजन सेफ इंडिया फॉर एव्हरीवन, ओडिशाचे संचालकरस्ता सुरक्षा ऑडिटर दिलीप कुमार पांडा, पुणे शहर वाहतूक शाखा आणि ऑटो लिव्ह कंपनी यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष राजू घाटोळे, सल्लागार संतोष कपटकर, प्रसिद्धी प्रमुख विनोद वरखडे, प्रोग्राम कोऑर्डिनेटरस्वयंसेवी संस्था सातारा यांच्या संचालिका शीतल विधाटे, पुणे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनीताई कदम, कार्यकारी संचालक मनोज विधाटे, शारदा शिंदे, स्वाती फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सरिता विद्यालयाच्या हायस्कूल विभागाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री सुपनेकर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली नेरळ, शिक्षक नेहा गोरे, सुप्रिया माने, समीर शिराळकर, मनूजया शिंदे, दिव्या शिंदे तसेच कलाशिक्षिका नीताली हरगुडे आणि इतर शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन व विद्यार्थ्यांचा अभिप्राय नीताली हरगुडे यांनी व्यक्त केला.

‘आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा जबाबदार वाहनचालक आणि रस्ता सुरक्षा दूत’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यास मोठी मदत झाली.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!