रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बहिणीचा मृतदेह पाहून भावाचा टाहो; शिल्पा गवारे मृत्यूने वाकड हादरले!

१७ वर्षांच्या संसारानंतर दोन मुलांच्या आईचा संशयास्पद अंत; माहेरच्या संपत्तीतील हिश्श्यासाठी छळ करून हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणाचा संताप ताजा असतानाच पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात उच्चभ्रू कुटुंबातील ३५ वर्षीय शिल्पा गवारे यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. तब्बल १७ वर्षांचा संसार, दोन मुलांची जबाबदारी आणि त्यानंतर संशयास्पद परिस्थितीत झालेला मृत्यू यामुळे या प्रकरणाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिल्पाच्या माहेरच्यांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून सासरच्यांनी केलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बहिणीचा मृतदेह रुग्णालयातील स्ट्रेचरवर पाहताच भावाने आणि आई-वडिलांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. “उद्या रक्षाबंधन आहे; पण मला राखी बांधायला माझी बहीणच राहिली नाही,” असे म्हणत भावाने संताप व्यक्त केला.

माहेरच्यांच्या आरोपानुसार, शिल्पाचा लग्नानंतर गेल्या १७ वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. तिला मारहाण करण्याबरोबरच गरम इस्त्रीचे चटके दिल्याचा गंभीर आरोप तिच्या आईने केला आहे. पती दारूच्या नशेत मारहाण करत असताना सासू-सासरे त्याला रोखण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

जमीन, व्यवसायासाठी मदत करूनही पैशांची हाव कायम?

शिल्पाच्या माहेरच्यांनी सासरकडील कुटुंबाला दोन एकर जमीन, व्यवसायासाठी मोठी आर्थिक मदत तसेच लाखो रुपयांची रोख रक्कम दिल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यानंतरही सासरच्यांची पैशांची मागणी थांबली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

माहेरच्या संपत्तीत हिस्सा मिळवून देण्यासाठी शिल्पावर सातत्याने दबाव आणला जात होता. याच आर्थिक वादातून तिचा छळ वाढत गेला आणि अखेर तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पतीवर लग्नापूर्वीच खुनाचा गुन्हा?

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपी पती सचिन उत्तम गवारे याच्यावर लग्नापूर्वीपासूनच भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिस तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिल्पाच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि त्याची पूर्वीच्या गुन्ह्याशी काही सांगड आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

See also  चाकण-महाळुंगे एमआयडीसीतील खड्ड्यांविरोधात गणेश बोत्रे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक संघटनेचा जाहीर पाठिंबा

चौघांना अटक; ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

शिल्पाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी पती सचिन उत्तम गवारे, सासरे उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दिर संदीप गवारे यांना अटक केली आहे. न्यायालयाने चौघांनाही ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, शिल्पाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, मृत्यूच्या आधी तिच्यासोबत काय घडले, तिच्यावर अत्याचार झाला होता का आणि या मृत्यूमागे आर्थिक वाद कारणीभूत आहे का, या सर्व बाबींचा तपास वाकड पोलीस करत आहेत.

माहेरच्यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असून, शिल्पाचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याचे गूढ पोलिस तपासातूनच उलगडणार आहे.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर