मोठ्या आवाजातील गाण्यावरून रक्तरंजित थरार! काकानेच भाच्यासह भावाचा चाकूने खून; विक्रोळीत खळबळ

काशिनाथ शिंदे : मुंबई

विक्रोळी (पश्चिम) येथील राहुल नगर परिसरात मोठ्या आवाजात लावलेल्या संगीताच्या वादातून एका कुटुंबात रक्तरंजित हत्याकांड घडले. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा (वय ४०) आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला, तर पत्नी अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा गंभीर जखमी झाले आहेत.

बुधवारी (६ ऑगस्ट) पहाटे पार्कसाइट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगर येथे ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक तपासानुसार, मोठ्या आवाजात सुरू असलेल्या संगीतावरून कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी बुक्के, लाथा आणि चाकूने सपासप वार केल्याचे समोर आले आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा मुलगा श्लोक यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पार्कसाइट पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनास्थळ सुरक्षित करून फॉरेन्सिक पथकाकडून तपास करण्यात आला आहे. या दुहेरी हत्येमागील नेमके कारण, घटनाक्रम आणि आरोपींचा सहभाग याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

See also  आळंदीत अवैध देशी दारूचा साठा जप्त; राठोड-खेडेकरांची दमदार कारवाई
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!