रुग्णालयातच दादागिरी! सुरक्षा रक्षकाच्या धक्क्याने तरुणाचा हात फ्रॅक्चर

काशिनाथ शिंदे: थेरगाव

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणाच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याने काळेवाडी पोलिसांनी संबंधित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास थेरगाव रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील जनरल मेडिसिन वॉर्डमध्ये घडली. फिर्यादी रमेश सुदाम भवाळ (वय २१, रा. मुकाई चौक, रावेत-किवळे) हे आजारी वडिलांच्या पलंगाशेजारी खाली झोपले होते. त्यावेळी ड्युटीवरील सुरक्षा रक्षकाने त्यांना उठवून वॉर्डच्या बाहेर जाण्यास सांगितले.

तक्रारीनुसार, रमेश भवाळ हे वॉर्डबाहेरील पॅसेजमधील बाकावर बसण्यासाठी जात असताना सुरक्षा रक्षक प्रकाश शिनगारे (वय ५५, रा. थेरगाव) यांनी मागून जोरात ओढून लोखंडी बाकावर ढकलले. या धक्क्यामुळे त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(ब) अंतर्गत सुरक्षा रक्षक प्रकाश शिनगारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंतनू निबाळकर करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे महापालिका रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

See also  पुणे महापालिकेच्या ४४२ सफाई कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!