मुख्य प्रवेशद्वार अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; निष्काळजीपणाचा ठपका, भारतीय न्याय संहिता कलम 106(1) अंतर्गत वाकड पोलिसांची कारवाई

काशिनाथ शिंदे : वाकड

पिंपरी-चिंचवड : ताथवडे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुख्य प्रवेशद्वार अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी शाळेचे प्राचार्य, शाळा प्रशासन आणि गेटच्या देखभालीस जबाबदार संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 106(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 389/2026 नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 8.10 वाजता शाळेचे सुरक्षा रक्षक संजय नागनाथ कांबळे हे मुख्य प्रवेशद्वार उघडत असताना लोखंडी गेट अचानक त्यांच्या अंगावर कोसळले. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना 2 ऑगस्ट 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर वाकड पोलिसांनी वैद्यकीय कागदपत्रे, एमएलसी, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळाची पाहणी तसेच सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी केली. या तपासात शाळेचे मुख्य प्रवेशद्वार सुरक्षित स्थितीत नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. गेटची आवश्यक दुरुस्ती, मजबुतीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने हा अपघात घडल्याचा निष्कर्ष पोलिसांनी नोंदविला आहे.

याप्रकरणी शाळेचे प्राचार्य, शाळा प्रशासन तसेच गेटच्या देखभाल आणि सुरक्षिततेस जबाबदार संबंधित व्यक्तींविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

See also  ‘मराठ्यांच्या नादाला लागून राजकीय करिअर उद्ध्वस्त करू नका!’; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना थेट इशारा
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!