प्रेमप्रकरणातून तरुणाचा निर्घृण खून; फरार आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद

काशिनाथ शिंदे : हिंजवडी

हिंजवडी परिसरात प्रेमप्रकरणातून झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणातील फरार आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी अवघ्या काही तासांत पुणे–सोलापूर महामार्गावरील नाकाबंदी दरम्यान अटक केली. आरोपी दिनेश महादेव झांबरे (वय २३, मूळ रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर; सध्या रा. मारुजी भुमकर चौक, हिंजवडी) याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे एका तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही शिक्षणासाठी पुण्यात आले. शिक्षणादरम्यान संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्याचा राग आरोपीच्या मनात होता.

याच कारणातून गुरुवारी (६ ऑगस्ट) आरोपी दिनेश झांबरे हा संबंधित तरुण व तरुणी राहत असलेल्या ठिकाणी गेला. त्याने लोखंडी रॉडने दोघांच्या डोक्यावर वार करून गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर आरोपी त्याच्या ताब्यातील इर्टिगा (क्र. MH-13-EK-5828) या कारमधून पुणे–सोलापूर मार्गे पंढरपूरच्या दिशेने फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळाजी पांढरे यांनी उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी संपर्क साधून आरोपीच्या वाहनाची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळीकांचन पोलिसांना देण्यात आली.

त्यानुसार पुणे–सोलापूर महामार्गावर तातडीने नाकाबंदी करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार सोमनाथ चितारे, सचिन जगताप, कमलेश हळे, निलेश जाधव, सचिन मोरे, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, विकास लगस तसेच पोलिस कॉन्स्टेबल ऋषिकेश रासकर, अश्वजित मोहोड आणि सुवर्णा गायकवाड यांनी नाकाबंदीदरम्यान भरधाव वेगाने येणारी संशयित इर्टिगा कार अडवून चालकाला ताब्यात घेतले.

See also  चार पोलिस अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त; सेवागौरव सोहळ्यात भावपूर्ण निरोप

चौकशीदरम्यान आरोपीने हिंजवडी येथील खून आणि हल्ल्याची कबुली दिली. त्यानंतर दिनेश झांबरे याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, आरोपीचा पाठलाग करत हिंजवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलिस उपनिरीक्षक अशोक दुधाणे, नरेश बलसाने, पोलिस हवालदार प्रशांत गिलबिले तसेच पोलिस कॉन्स्टेबल मिनीनाथ पवार व ओमप्रकाश कांबळे हे उरुळीकांचन पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!