सांगवीत पोलिसिंगचा नवा अध्याय!; स्वतंत्र एसीपी कार्यालयामुळे कारभार होणार अधिक गतिमान

काशिनाथ शिंदे : सांगवी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी विभागासाठी स्वतंत्र सहायक पोलीस आयुक्त कार्यालय सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच विभागातील कार्यालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने हे नवीन कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.

नवीन कार्यालयाचे उद्घाटन ६ ऑगस्ट२०२६ रोजी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण व फीत कापून करण्यात आले. यावेळी चौबे यांनी सांगवी विभागातील अधिकारी व अंमलदारांना शुभेच्छा देत नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ पोलीस सेवा देण्याच्या सूचना दिल्या.

आधुनिक सुविधा, सुबक कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यपद्धतीमुळे सांगवी विभागातील नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संबंधित कामांसाठी अधिक प्रभावी सेवा मिळण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी व समस्या अधिक तत्परतेने हाताळण्यावर भर देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

या उद्घाटन कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, तसेच पोलीस उपआयुक्त संदिप आटोळे, रोहिदास पवार, प्रदीप जाधव, मारुती जगताप, विक्रांत देशमुख आणि धिरज पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सांगवी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त मनिषा कदम, पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, परिमंडळ-१ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सांगवी विभागातील कार्यालयीन कर्मचारी यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.

स्वतंत्र एसीपी कार्यालयामुळे सांगवी विभागातील पोलीस प्रशासन अधिक सक्षम होऊन ‘नागरिक प्रथम’ या भूमिकेतून सेवा देण्यास चालना मिळणार आहे.

See also  चिमुकलीच्या शोधात ग्रामस्थांसोबत फिरत होता आरोपी; CCTVने उघड केला हत्येचा रहस्यभे
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!