शिंदे गटाला सोडचिठ्ठी; सप्पागुरूंची ‘घरवापसी’!

शशिकांत सप्पागुरू यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश; शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

काशिनाथ शिंदे : मावळ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मावळ तालुक्यात आणखी एक बळ मिळाले आहे. श्री. शशिकांत सप्पागुरू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करून ‘घरवापसी’ केली. शिवसेना भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.

यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना प्रवक्ते नितीन नांदगावकर, मावळ तालुका संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, जिल्हा समन्वयक शांताराम भोते, जिल्हा सल्लागार मारुती खोले, शिवसेना जिल्हा सल्लागार रमेश जाधव, शिवसेना शहरप्रमुख संदीप बालघरे, महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, राजेंद्र मोरे, देहू शहरप्रमुख विशाल गांधीले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“जुन्या सहकाऱ्यांसाठी पुन्हा घरवापसी”

पक्षप्रवेशानंतर शशिकांत सप्पागुरू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “शिंदे गटात काम करताना मन लागत नव्हते. माझे अनेक जुने जिवाभावाचे सहकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे मी पुन्हा माझ्या जुन्या घरात परतण्याचा निर्णय घेतला. आता पक्षात पुन्हा प्रवेश केल्यानंतर मला खूप समाधान वाटत आहे.”

सप्पागुरू यांच्या ‘घरवापसी’मुळे मावळ परिसरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

पक्षविस्ताराला मिळणार नवे बळ

मावळ तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच सप्पागुरू यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“जुने सहकारी पुन्हा एकत्र; मावळात ठाकरे शिवसेनेचा संघटनात्मक पाया अधिक मजबूत करण्याचा निर्धार”, असा संदेश या पक्षप्रवेशातून देण्यात आला.

See also  ज्ञान माऊली’तून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!