चिमुकलीच्या शोधात ग्रामस्थांसोबत फिरत होता आरोपी; CCTVने उघड केला हत्येचा रहस्यभे

काशिनाथ शिंदे

जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. सायकल शिकवण्याच्या बहाण्याने चिमुकलीला घरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर नेण्यात आले. त्यानंतर सायकल एका ठिकाणी सोडून तिला घनदाट ऊसाच्या शेतात नेण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

निर्मनुष्य ठिकाणाची आरोपीने आधीच पाहणी केली होती का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, एका घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजने या गुन्ह्याच्या तपासाला निर्णायक दिशा मिळाल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधासाठी ग्रामस्थ आणि पोलिसांसोबत आरोपीही फिरत होता. तपासाची दिशाभूल करून संशयापासून दूर राहण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे त्याच्या हालचाली संशयाच्या भोवऱ्यात आल्या.

पोलिसांनी उपलब्ध पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने हलवली आणि अखेर आरोपीचे बिंग फुटले. पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

या अमानुष घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून, चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नसरापूर प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातही जलदगतीने तपास पूर्ण करून दोषीला कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सीसीटीव्हीच्या एका फुटेजने तपासाला कलाटणी दिली आणि ग्रामस्थांसोबतच चिमुकलीचा शोध घेणाऱ्या संशयिताचा चेहराच अखेर उघड झाला!

See also  'मृत्यूचा मनोरा' ठरतेय एमबी कॅम्पची पाण्याची टाकी; दुर्घटनेपूर्वी कारवाईची नागरिकांची हाक!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!