जप्त सहा वाहनांचा २१ ऑगस्टला जाहीर ई-लिला

थकबाकी न भरलेल्या वाहनांवर आरटीओची कारवाई; ऑनलाइन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन

काशिनाथ शिंदे

पुणे : मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच वाहन कर आणि इतर शासकीय थकबाकी न भरल्यामुळे ताब्यात घेण्यात आलेली सहा वाहने आता ई-लिलावात काढण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या माध्यमातून हा जाहीर ई-लिलाव शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळीवाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

इच्छुकांना एमएसटीसी इंडियाच्या संकेतस्थळावरून या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ई-लिलावासाठी पात्र सहा वाहनांची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लिलावातील वाहनांची भंगार म्हणून विक्री करण्यासाठी आवश्यक अटी व शर्तीही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत नोंदणीकृत वाहन भंगार सुविधा (RVSF) संस्थांनाही सहभागी होता येणार आहे.

दरम्यान, संबंधित वाहनमालक, चालक अथवा अन्य हितसंबंधित व्यक्तींना लिलावापूर्वी वाहनावरील थकबाकी आणि संबंधित रक्कम भरण्याची संधी देण्यात आली आहे. थकबाकीची पूर्तता करून वाहन सोडवून घेता येणार असून, त्यानंतर ई-लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

या ई-लिलावाबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  पवनचक्की प्रकल्पातील वीजवाहिनी तारांची चोरी उघड! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ गुन्हे उघड, २ आरोपी जेरबंद, १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!