गळा आवळून महिलेचा निर्घृण खून; सासूसह पाच आरोपी गजाआड

काशिनाथ शिंदे

मुंबई : घाटकोपरमधील लक्ष्मीनगर येथे महिलेचा गळा आवळून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अवघ्या काही दिवसांत करत मयत महिलेच्या सासूसह पाच आरोपींना अटक केली आहे. खुनासाठी तब्बल तीन लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

सपना प्रमोद गंजी (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरुवातीला बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, मृतदेहाच्या गळ्याभोवती काळे-निळे डाग तसेच डोक्याला झालेला रक्तस्त्राव पाहून पोलिसांचा संशय बळावला.

१७ ऑगस्ट रोजी रात्री राजावाडी रुग्णालयातून पंतनगर पोलिसांना महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली. त्यावेळी मयत महिलेची सासू धनलक्ष्मी भिक्षापती गंजी हिने सपना हिला भांडणातून ढकलल्याने ती बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी कसून तपास सुरू केल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले.

पोलिस तपासात धनलक्ष्मी गंजी हिनेच सुनेच्या खुनाचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. सपना हिच्याशी असलेल्या जुन्या वादातून तसेच तिच्याविरोधातील पूर्वीच्या तक्रारींच्या रागातून हा कट रचण्यात आल्याचे समोर आले.

धनलक्ष्मीने तिची पूर्वीची मोलकरीण मंगलाबाई सुरेश जाधव आणि तिच्या कुटुंबीयांना या कटात सहभागी करून घेतले. सपना हिचा खून केल्याच्या मोबदल्यात त्यांना तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते.

१६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सपना घरात एकटी असताना आरोपी एकामागून एक घरात शिरले. सपना दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेत तिच्या डोक्यात काचेचा ग्लास मारण्यात आला. त्यानंतर तिच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून ओढणीने गळा आवळण्यात आला. तरीही तिचा जीव जात नसल्याने आरोपी सुरेश जाधव आणि साजन जाधव यांनी तिच्या गळ्यावर पाय ठेवून तिला ठार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

See also  "गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करा!" ताम्हिणी-भोर-वरंधा घाट रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मुख्यमंत्र्यांकडे

खून केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींची चौकशी यांच्या आधारे खुनाचा कट उघडकीस आणला.

या प्रकरणी धनलक्ष्मी भिक्षापती गंजी हिला १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर मंगलाबाई सुरेश जाधव, शिवानी सुरेश जाधव, सुरेश गणपत जाधव आणि साजन सुरेश जाधव या चौघांना १८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने अनुक्रमे २४ ऑगस्ट आणि २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार, पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे, अजित गोंधळी, राजेश चंदुगडे, अस्लम खतीब, सपोनि उमेश शिंदे, दगडू जाधव, प्रशांत कुंभार तसेच पंतनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!