फॅन्सी नंबर प्लेट, बेकायदा सायलेन्सरला वाहतूक पोलिसांचा दणका

पिंपरी-चिंचवडमध्ये २,५०५ वाहनांवर कारवाई; ४०० सायलेन्सर, ८०२ काळ्या काचांच्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई

काशिनाथ शिंदे

पिंपरी : फॅन्सी आणि नियमबाह्य नंबर प्लेट, मोठ्या आवाजाचे बेकायदा सायलेन्सर तसेच काळ्या काचा लावून वाहतूक नियमांची ऐशीतैशी करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध भागांत राबविलेल्या विशेष मोहिमेत फॅन्सी नंबर प्लेटच्या तब्बल २ हजार ५०५ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय सुमारे ४०० बेकायदा सायलेन्सर आणि ८०२ काळ्या काचा असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सांगवी, दिघी-आळंदी, वाकड, पिंपरी, मोशी, देहूरोड, तळेगाव, भोसरी, चिंचवड, निगडी, बावधन, चाकण आणि हिंजवडी वाहतूक विभागांच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. नियमबाह्य किंवा अस्पष्ट नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख पटविण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशा वाहनचालकांना लक्ष्य करून पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला.

या मोहिमेत निगडी वाहतूक विभागात सर्वाधिक ३६० वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ भोसरीमध्ये २७६, तळेगाव २५०, सांगवी २४०, चाकण २२८ आणि हिंजवडीमध्ये २२४ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, मोठ्या आवाजाचे तसेच नियमबाह्य सायलेन्सर बसवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनांवरही वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. सुमारे ४०० बेकायदा सायलेन्सरवर कारवाई करूनलाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच काळ्या काचा असलेल्या ८०२ वाहनांवर कारवाई करूनलाख ५५ हजार ५५५ रुपयांचा दंड आकारण्यात आला.

फॅन्सी नंबर प्लेटच्या १ हजार ४३८ प्रकरणांमध्ये ११ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आकर्षक, अस्पष्ट किंवा नियमबाह्य पद्धतीने नंबर प्लेट लावल्याने वाहनाची ओळख लपविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे अशा वाहनांवरील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

See also  डॉ. सुनील धनगर यांच्या निवेदनाने ‘मन तुझं जलतरंग’ची मैफल ठरली अविस्मरणीय

पिंपरी, निगडी, हिंजवडी, चाकण, बावधनसह शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविणाऱ्या वाहनांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा आणि बेकायदा सायलेन्सरचा वापर करणाऱ्यांनी सावध व्हावे; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!