काशिनाथ शिंदे
पिंपरी : चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट ३च्या पथकाने त्याला साथीदारासह ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (दि. २२) एमआयडीसी भोसरी परिसरातील सेक्टर ७ येथे करण्यात आली.
रोहित रवी लव्हाळे (वय २८, रा. शिवशंकर कॉलनी क्रमांक १, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे ताब्यात घेतलेल्या पाहिजे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत अर्जुन धर्मराज ढोले (वय २७, रा. कोकरे चाळ, गुळवेवस्ती, भोसरी) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत अर्जुन ढोले याचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखा युनिट ३चे पथक पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रोहित लव्हाळे हा सेक्टर ७, एमआयडीसी भोसरी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून रोहित लव्हाळे याला त्याच्या एका साथीदारासह ताब्यात घेतले. चौकशीत अर्जुन ढोले याचा देखील गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६, ३१७(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस हवालदार सोमनाथ बोऱ्हाडे, पोलीस अंमलदार अजित रुपनवर, दिलीप राठोड आणि स्वप्निल महाले यांच्या पथकाने केली.







