चाकणच्या उद्योगांना ‘पॉवर बूस्ट’; महावितरणची यंत्रणा सक्षम

दोन उपकेंद्रांत प्रत्येकी १० एमव्हीएची अतिरिक्त रोहित्रे कार्यान्वित; महापारेषणकडूनही १०० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राची तयारी

काशिनाथ शिंदे :पुणे

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढती वीज मागणी आणि भविष्यातील औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन महावितरणने वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांना वेग दिला आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. २२) चाकण एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी ३३/२२ केव्ही भांबोली आणि ह्युंदाई उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० एमव्हीए क्षमतेची रोहित्रे कार्यान्वित करण्यात आली.

ह्युंदाई येथील केंद्र यापूर्वी केवळ स्विचिंग स्टेशन म्हणून कार्यरत होते. मात्र, चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढता वीजभार लक्षात घेऊन त्याचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य अभियंत्यांच्या पाठपुराव्यानंतर संचालक धनंजय औंढेकर यांनी या कामास तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार ह्युंदाई केंद्राचे उपकेंद्रात रूपांतर करून ते कार्यान्वित करण्यात आले आहे.

याचबरोबर भांबोली उपकेंद्रातही अतिरिक्त १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले. या दोन्ही उपाययोजनांमुळे चाकण औद्योगिक परिसरातील वीजपुरवठ्याची क्षमता वाढून औद्योगिक ग्राहकांना अधिक विश्वासार्ह वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असून आगामी काळात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरण आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत, भविष्यातील वीज मागणीचे अचूक नियोजन करावे आणि औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश धनंजय औंढेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.

महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेचीही पाहणी

धनंजय औंढेकर यांनी महापारेषणच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही ब्रिजस्टोन आणि २२० केव्ही चाकण फेज-२ या अतिउच्चदाब उपकेंद्रांचीही पाहणी केली. आगामी काळातील वीजपुरवठ्याचे नियोजन आणि सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.

See also  रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई

२२० केव्ही ब्रिजस्टोन उपकेंद्रात नुकतेच ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच ४०० केव्ही चाकण उपकेंद्रात २२ केव्हीचे चार अतिरिक्त फिडर बे उभारण्याचे काम सुरू आहे. २२० केव्ही चाकण फेज-२ उपकेंद्रात अतिरिक्त १०० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याची माहिती महापारेषणच्या अभियंत्यांनी दिली.

या सर्व उपाययोजनांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वीज मागणीला सामोरे जाण्यासाठी महावितरण आणि महापारेषणची यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!