वाल्हेकरवाडीत घुमला खानदेशच्या कुलस्वामिनी माता कानबाईचा जयघोष

अहिराणी भजन-गाण्यांच्या तालावर तीन दिवस पूजाअर्चा; भव्य शोभामिरवणुकीत हजारो कानबाई भक्तांचा सहभाग

काशिनाथ शिंदे

पिंपरी : खानदेशची कुलस्वामिनी माता कानबाई उत्सव २०२६ चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अहिराणी भजने, पारंपरिक गीते आणि खानदेशी पावलीच्या तालावर तीन दिवस माता कानबाईची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. उत्सवाच्या सांगता दिवशी काढण्यात आलेल्या भव्य शोभामिरवणुकीत हजारो कानबाई भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर दुमदुमून सोडला.

खानदेशातून पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांनी आपली संस्कृती, परंपरा आणि लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी, या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषा, अहिराणी गीते, भजने, ढोल-ताशांचा गजर आणि ‘माता कानबाईचा जयघोष’ यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. महिला आणि तरुणाईचा उत्सवातील सहभाग विशेष लक्षणीय ठरला.

शोभामिरवणुकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिजित बारणे, महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयोजक नामदेव ढाके, माण गावचे सरपंच सचिन आढाव, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, विकास साने, नाना काटे, शेखर चिंचवडे, आशा सूर्यवंशी, सचिन चिंचवडे, बापू कातळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कानबाईच्या गाण्यावर मंत्री, आमदारांचाही ठेका

माता कानबाईच्या उत्सवात अहिराणी गीतांचा रंग चढताच भक्तीला उत्साहाची जोड मिळाली. अहिराणी गीतांच्या तालावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार शंकर जगताप, आयोजक नामदेव ढाके आणि सदाशिव खाडे यांनीही उत्स्फूर्तपणे ठेका धरला. मंत्र्यांसह आमदारांनी ताल धरताच उपस्थित कानबाई भक्तांनी जल्लोष करत वातावरण आणखी उत्साहपूर्ण केले. खानदेशी संस्कृतीच्या या रंगात मंत्री संजय सावकारे यांचा सहभाग सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला.

See also  'मृत्यूचा मनोरा' ठरतेय एमबी कॅम्पची पाण्याची टाकी; दुर्घटनेपूर्वी कारवाईची नागरिकांची हाक!

‘खानदेशची संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवा’

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, “खानदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतरही आपली संस्कृती आणि परंपरा जपली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. माता कानबाई ही खानदेशातील कुलस्वामिनी असून तिचा जागर करून ही परंपरा शहरी भागातील पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम कौतुकास्पद आहे.”

सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “माता कानबाईच्या माध्यमातून खानदेशाची परंपरा आणि इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम होत आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलांना आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरांची माहिती द्यावी.”

अहिराणी भाषेचे जतन करा

आमदार शंकर जगताप यांनी अहिराणी भाषेच्या जतनाचे आवाहन केले. “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याचप्रमाणे अहिराणी भाषेचेही जतन होणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना अहिराणी भाषा शिकवून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवावी,” असे आवाहन त्यांनी केले.

माता कानबाईच्या भक्तीबरोबरच खानदेशी संस्कृती, भाषा, लोककला आणि परंपरेचा जागर घडविणाऱ्या या उत्सवाची सांगता जल्लोषात झाली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या शोभामिरवणुकीने वाल्हेकरवाडी परिसरात खानदेशी संस्कृतीचा अनोखा रंग पाहायला मिळाला.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!