राखीच्या धाग्यातून जपला विश्वास; पोलिसांच्या सेवेतून सुरक्षिततेची हमी

काशिनाथ शिंदे

गुन्हे शाखा युनिट-३मध्ये विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा

पिंपरी-चिंचवड : रक्षाबंधनाच्या निमित्ताने गुन्हे शाखा युनिट-३च्या कार्यालयात ज्ञानाई हायस्कूल, चिखली-जाधववाडी येथील विद्यार्थिनींनी पोलिस अधिकारी व अंमलदारांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. या उपक्रमातून पोलीस आणि समाजातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले.

यावेळी विद्यार्थिनींना पोलिस विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच सायबर गुन्ह्यांपासून बचाव, गुड टच-बॅड टच, व्हिजिबल पोलिस तसेच महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक टाळताना कोणती काळजी घ्यावी, संशयास्पद प्रकार घडल्यास पोलिसांशी कसा संपर्क साधावा, याबाबतही विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात विद्यार्थिनींनी गुन्हे शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांना प्रेमाने राखी बांधली. पोलिस बांधवांनीही या निरागस बहिणींना प्रेमाची छोटीशी भेट देत त्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यामुळे रक्षाबंधनाचा हा सोहळा केवळ औपचारिक न राहता पोलीस-विद्यार्थिनी यांच्यातील जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते जपणारा भावनिक क्षण ठरला.

पोलीस दलाकडून नागरिकांच्या सुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचेही यावेळी महत्त्व अधोरेखित झाले.

“राखीच्या धाग्यातून जपलेला विश्वास आणि पोलिसांच्या सेवेतून दिलेली सुरक्षिततेची हमी,” असा संदेश देत या विशेष उपक्रमाची सांगता झाली. ज्ञानाई हायस्कूलच्या विद्यार्थिनी, शिक्षकवृंद आणि आयोजकांचे गुन्हे शाखा युनिट-३कडून आभार मानण्यात आले.

See also  वाहन हस्तांतरण ठप्प; चालक-मालक महासंघाचे नितीन गडकरींकडे साकडे
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!