प्रतिबंधित विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर प्रशासनाचा दणका; कालठणमध्ये साठे नष्ट

संवर्धकांविरोधात गुन्हे दाखल; जलपरिसंस्था आणि स्थानिक माशांच्या प्रजातींना धोका

काशिनाथ शिंदे

पुणे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ तसेच इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ परिसरात प्रतिबंधित विदेशी मांगूर (Clarias Gariepinus) माशांचे अनधिकृत संवर्धन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. जिल्हाधिकारी, पुणे यांनी गठीत केलेल्या समितीच्या पथकाने केलेल्या या कारवाईत मांगूर माशांचे साठे नष्ट करण्यात आले.

प्रतिबंधित मांगूर माशांचे अनधिकृत संवर्धन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम २२३, अन्न सुरक्षामानके अधिनियम २००६ मधील कलम ५९ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ मधील कलम ३, ५ व १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मांगूर माशांमुळे मानवी आरोग्यासोबतच जलपरिसंस्थेलाही गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हे मासे नदी, तलाव किंवा अन्य जलाशयांमध्ये गेल्यास कटला, रोहू, मृगळ यांसारख्या स्थानिक माशांच्या प्रजातींवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक जैवविविधतेचे संतुलन बिघडण्याचा धोका निर्माण होतो.

मांगूर संवर्धनावर १९९७ पासून बंदी

पर्यावरण आणि जलपरिसंस्थेवरील संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेऊन भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने १९ डिसेंबर १९९७ रोजीच्या पत्रान्वये विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर बंदी घातली आहे. त्यानंतरही अनधिकृतपणे या माशांचे संवर्धन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.

आरोग्य व पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्रतिबंधित मांगूर माशांचे अनधिकृत संवर्धन करू नये. असे संवर्धन आढळून आल्यास नागरिकांनी त्याची माहिती acfpune@gmail.com या ई-मेलवर मत्स्यव्यवसाय कार्यालयास द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे अर्चना घि. शिंदे यांनी केले आहे.

See also  मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!