श्रमिकांच्या कष्टातूनच उभी राहिली कामगारनगरी; महापौर रवी लांडगे

परिचारिका मीरा शिंदे यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार २०२६’ने गौरव

काशिनाथ शिंदे

पिंपरी,  “पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,” असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितले आहे. त्याच कष्टकरी आणि श्रमिकांच्या योगदानातून पिंपरी-चिंचवड या औद्योगिक व कामगारनगरीचा विकास झाला आहे, असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.

हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमात परिचारिका मीरा शिंदे यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार २०२६’ महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले की, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढणारे इंटकचे प्रदेशाध्यक्ष आणि हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली संघटना देशभर कार्यरत आहे. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी एका कामगाराचा सन्मान केला जातो. यंदा प्रथमच एका परिचारिका महिलेला हा पुरस्कार देण्यात येत असून, हा केवळ मीरा शिंदे यांचा नव्हे, तर सर्व परिचारिकांचा सन्मान आहे. इतरांसाठीही हा पुरस्कार प्रेरणादायी आहे.

मीरा शिंदे यांनी स्वाईन फ्लू तसेच कोरोना महामारीच्या काळातही रुग्णसेवेचे कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडले. नूतन भोसरी रुग्णालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या मीरा शिंदे यांची पुरस्कारासाठी झालेली निवड सार्थ असल्याचेही महापौर लांडगे यांनी सांगितले.

३१ वर्षांची सेवा; महापालिकेत २७ वर्षे रुग्णसेवा

डॉ. कैलास कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना सांगितले की, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली कामगार संघटना आहे. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हिंद कामगार संघटना कार्यरत आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, गुलझारीलाल नंदा, पंडित जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद यांसारख्या दिग्गजांनी इंटकचे नेतृत्व केले आहे.

See also  मोशी दुर्घटनेला गुन्हे तपासाची दिशा; मृत्यूमागील कारणांचा पोलिसांकडून सखोल शोध

देशातील अनेक सरकारी आस्थापना तसेच खासगी कारखान्यांमध्ये कामगारांचे नेतृत्व इंटकच्या माध्यमातून केले जाते. यंदाचा ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार’ महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते प्रदान करताना आम्हाला विशेष अभिमान वाटत असल्याचे डॉ. कदम यांनी नमूद केले.

मीरा शिंदे यांनी नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत एकूण ३१ वर्षे सेवा केली असून, त्यापैकी २७ वर्षे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत रुग्णसेवा बजावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना आम्हाला अभिमान वाटत असल्याचेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.

कार्यक्रमास माजी नगरसेवक सद्गुरु कदम, भारती घाग, निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ मोरे, हाफिज पठाण, आनंदराव फडतरे, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, सचिन कदम, उत्तम गायकवाड, सारिका भिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गोरिले यांनी केले, तर यशवंत सुपेकर यांनी आभार मानले.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!