शिवानी नरळे यांनी सभागृहात उठवला प्रभाग १२ मधील कचरा, प्रदूषणाचा गंभीर प्रश्न!

रूपीनगर-तळवडे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न; कचरा संकलनाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी

काशिनाथ शिंदे

पिंपरी,  रूपीनगर-तळवडे परिसरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये कचरा व्यवस्थापनाचा उडालेला बोजवारा आणि वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सौ. शिवानीताई दादासाहेब नरळे यांनी महापालिकेच्या सभागृहात उपस्थित केला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी महापौर व महापालिका आयुक्तांकडे केली.

प्रभागातील अनेक भागांत नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कचरा संकलन करणाऱ्या वाहनांचे निश्चित वेळापत्रक आणि मार्ग निश्चित करून ते नागरिकांसाठी जाहीर करावेत, अशी मागणी शिवानी नरळे यांनी केली.

तसेच, रूपीनगरजवळील मोकळ्या जागेत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा टाकला जात असल्याचा आणि हा कचरा जाळला जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर व प्रदूषण निर्माण होत असल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात मांडला. कचरा जाळण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करून नागरिकांना धुराच्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.

ज्या ठिकाणी कचरा साचला आहे, तो तात्काळ हटवावा. भविष्यात त्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जाणार नाही किंवा जाळला जाणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. यासाठी महापालिका प्रशासन आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने समन्वय साधून ठोस कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका शिवानी नरळे यांनी मांडली.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सौ. शिवानीताई दादासाहेब नरळे यांनी केली आहे.

See also  रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!