बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयाने पुण्याच्या विकासाला मिळणार नवी दिशा!

४० हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेणारा शाश्वत कॅम्पस; पुण्याला वेगवान मोबिलिटीचे शहर बनविण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

काशिनाथ शिंदे

पुणे, बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे अत्याधुनिक, पर्यावरणपूरक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा शासनाचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बजाज फिनसर्व्ह सीएसआरच्या अध्यक्षा शेफाली बजाज, बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह बजाज समूहाचे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुण्याच्या वाहतुकीला मिळणार वेग

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे आणि मुंबई ही देशातील फिनटेक परिसंस्थेची प्रमुख केंद्रे बनली आहेत. पुणे वेगाने विस्तारत असताना त्याला अनुरूप पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. बाह्य व अंतर्गत रिंगरोड तसेच भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. पुढील तीन ते चार वर्षांत पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले आधुनिक शहर म्हणून निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

बजाज फिनसर्व्हचा हा आधुनिक परिसर पुण्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. या प्रकल्पामुळे सुमारे ४० हजार कर्मचारी या परिसराशी जोडले जाणार आहेत. मुख्यालयाला जोडणारा रस्ता आणि अतिरिक्त पूल इमारतींचे काम पूर्ण होण्यापूर्वी उभारण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

फिनटेक क्षेत्राचे नेतृत्व महाराष्ट्राकडे

आर्थिक व्यवहार व बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्याला आणखी पुढे नेण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. देशांतर्गत विमा आणि डिजिटल कर्जवितरणाच्या बाजारपेठेत महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फिनटेक क्षेत्रातील महाराष्ट्राचे नेतृत्व अधिक भक्कम करण्यासाठी बजाज फिनसर्व्हने राज्य शासनासोबत सहकार्य करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

See also  शेतकऱ्यांच्या घरातून खाकीचा चौकार! किवळच्या चार युवकांची मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलात दमदार निवड

नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या शहरांमध्येही फिनटेक परिसंस्था विस्तारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमध्येही लवकरच बजाज फिनसर्व्हच्या सेवा सुरू होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बजाज समूहाने स्थापनेपासून भारताच्या औद्योगिक विकासात आणि राष्ट्रनिर्माणात दिलेल्या योगदानाचा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभागाचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.

‘बजाज’चा कॅम्पस पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला बळ देणार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बजाज समूहाचा शंभर वर्षांचा वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची दूरदृष्टी यांचा संगम नव्या कॅम्पसमध्ये पाहायला मिळणार आहे. हा कॅम्पस पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला नवी ताकद देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बजाज फिनसर्व्हचा महाराष्ट्र शासनासोबत ६ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला असून, त्यातून राज्यातील गुंतवणूक आणि वित्तीय सेवा क्षेत्राला चालना मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय सेवांमध्ये आधुनिकता आणण्याचा समूहाचा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, इन्शुअरटेक, डेटा ॲनालिटिक्स आणि डिजिटल वित्तीय सेवा या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार व कौशल्यविकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. नव्या कॅम्पसमुळे तरुणांना नवीन कौशल्ये, कल्पना आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे पवार यांनी नमूद केले.

७.२ दशलक्ष चौरस फुटांचा अत्याधुनिक कॅम्पस

बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी प्रास्ताविक केले. पुण्यातील तब्बल ७.२ दशलक्ष चौरस फुटांचा हा नवा परिसर शाश्वतता, पर्यावरणपूरक रचना, कर्मचारी कल्याण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ऊर्जा व पाणी बचत तंत्रज्ञान तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वास्तुरचनेचा या कॅम्पसमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ कॉर्पोरेट मुख्यालय न राहता पुण्याच्या आधुनिक आणि ज्ञानाधारित विकासाचे नवे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!