पुणे जिल्ह्याचे प्रेरणास्थान सतिश दादा मोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏
॥ श्री स्वामी समर्थ ॥
काशिनाथ शिंदे
पुणे जिल्ह्याचे प्रेरणास्थान, आध्यात्मिक, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण करणारे आदरणीय सतिश दादा मोटे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आध्यात्मिकता, समाजसेवा, उद्योग आणि कौटुंबिक जीवन या सर्वांचा सुंदर समन्वय साधत सतिश दादा मोटे यांनी आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील हजारो सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी सेवा, साधना, श्रद्धा आणि संस्कारांची ज्योत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे.
सेवा केंद्र म्हणजे केवळ एक वास्तू नसून, सेवा, साधना आणि समाजप्रबोधनाचे केंद्र कसे असावे, याची कृतीतून शिकवण त्यांनी दिली आहे. मेहनत, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन या गुणांच्या बळावर आध्यात्मिक क्षेत्रासोबतच उद्योग क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
त्यांचा जीवनप्रवास आणि कार्यपद्धती आज असंख्य सेवेकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अलीकडेच प्राप्त झालेला ‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’ हा त्यांच्या उल्लेखनीय कर्तृत्वाचा आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण सन्मान आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो. आपल्या हातून अशीच निरंतर सेवा, समाजप्रबोधन आणि विधायक कार्य घडत राहो, तसेच आपणास उत्तम आरोग्य, यश, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, हीच श्री स्वामी समर्थ चरणी मनःपूर्वक प्रार्थना!
आदरणीय सतिश दादा मोटे आपणांस वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 💐🎂🙏
॥ श्री स्वामी समर्थ ॥







