पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी संधी; ‘NS’ नवीन मालिकेची नोंदणी लवकरच

पिंपरी-चिंचवड आरटीओकडून वाहनमालकांना अर्ज करण्याचे आवाहन;सप्टेंबरला अर्जाची मुदत

 

काशिनाथ शिंदे

पुणे,  पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (नवीन इमारत, मोशी) वतीने चारचाकी वाहनांसाठी ‘NS’ ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरून घेऊ इच्छिणाऱ्या वाहनमालकांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करताना अर्जासोबत डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. डीडी हा ‘DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे पुणे येथील नॅशनलाईज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा.

सप्टेंबरला क्रमांकांची यादी प्रसिद्ध

चारचाकी वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या पसंतीच्या क्रमांकांची यादी ९ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एखाद्या क्रमांकासाठी विहित शुल्कापेक्षा अधिक रकमेचा डीडी सादर करून लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र अर्जदारांनी तो सीलबंद पाकिटातसप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा.

सीलबंद पाकिटे त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात, नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. विहित शुल्कापेक्षा अधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या पात्र अर्जदारास संबंधित पसंतीचा नोंदणी क्रमांक वितरित करण्यात येईल.

लिलावानंतर उर्वरित क्रमांक ऑनलाइन उपलब्ध

लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पसंतीचे नोंदणी क्रमांक ऑनलाइन पद्धतीने आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकदा आरक्षित केलेला नोंदणी क्रमांक नंतर बदलता येणार नाही.

तसेच, आरक्षणाच्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादरकेल्यास आरक्षित क्रमांक आपोआप रद्द होणार असून, त्यासाठी भरलेले शुल्क सरकारजमा करण्यात येईल. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता अथवा अन्य शुल्कात समायोजित करता येणार नाही.

See also  टॉयलेटची भिंत फोडून 'आराध्या ज्वेलर्स'वर डल्ला; 'मनी हाईस्ट' स्टाईल चोरीने पुणे हादरले!

आकर्षक नोंदणी क्रमांकाच्या शुल्कात शासनाकडून बदल करण्यात आल्यास त्या वेळी लागू असलेले सुधारित विहित शुल्क आकारण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!