दिव्यांग महिलेवरील अमानुष अत्याचाराने पिंपरी-चिंचवड हादरले!

दोषींवर कठोर कारवाई करा; राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे आग्रही मागणी

 

काशिनाथ शिंदे

पिंपरी   पिंपरी-चिंचवड शहरात एका दिव्यांग महिलेवर सराईत गुन्हेगाराने केलेल्या अमानुष आणि पाशवी अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविका व महिला कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांना दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार किशोर पवार याने दिव्यांग महिलेवर बेदम मारहाण केली. तिचे केस कापून तिला विद्रूप करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून या नृशंस कृत्याचे चित्रीकरण करण्यात आले आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या संतापजनक प्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक झाली असली तरी, पीडितेवर जबरदस्तीने झालेल्या अत्याचाराची गंभीरता लक्षात घेता लागू असलेल्या बलात्काराच्या तरतुदींसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला शिष्टमंडळाने केली. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याने भविष्यात अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर जरब बसण्यासाठी कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड नको! पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने करावा, दोषींवर लागू असलेल्या सर्व कठोर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी आणि अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर संदेश द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत संबंधित पोलीस प्रशासनाला प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

See also  शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील खरे शिल्पकार – युवासेना शहर संघटक निलेश हाके

या शिष्टमंडळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका अश्विनी वाबळे, वैशाली काळभोर, माया बारणे, निकिता कदम, भीमाताई फुगे, प्रियंका कुदळे, दीप्ती कांबळे, माजी नगरसेविका आशा शेंडगे, सामाजिक कार्यकर्त्या प्रीतम शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!