वाकडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी बांधली राखी
काशिनाथ शिंदे
वाकड : वाकड येथील ईओएन वेस्ट आयटी पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाकड येथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून नगरसेविका श्रुती राम वाकडकर यांनी राखी बांधत रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
यावेळी महिला भगिनींच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासोबतच राज्यातील महिलांची सुरक्षितता, सन्मान आणि सक्षमीकरण यासाठी शासन ठामपणे कार्यरत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
रक्षाबंधनाच्या या स्नेहबंधातून महिला शक्तीच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षित, सक्षम व आत्मनिर्भर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार शंकरभाऊ जगताप, पिंपरी-चिंचवड भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, नगरसेविका रेश्माताई भुजबळ, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, नगरसेवक राहुल कलाटे, चेतन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वानिमित्त सर्व महिला भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!







