डीपी फोडून तांब्याच्या तारांवर डल्ला! आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट-७ कडून पर्दाफाश

उत्तर प्रदेशातील तिघे जेरबंद;ट्रान्सफॉर्मर चोरीची कबुली, १२.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पुणे

पुणे शहरासह ग्रामीण भागात महावितरणचे ट्रान्सफॉर्मर (रोहित्र/डीपी) फोडून त्यातील महागड्या तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट-७च्या पथकाने पर्दाफाश केला. वाडेगाव (ता. हवेली) येथे सापळा रचून संशयित मालवाहू टेम्पोचा पाठलाग करत पोलिसांनी उत्तर प्रदेशातील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद साहेबजान मंगरेखान (वय ३०), आदर्श चंद्रप्रकाश पांडे (वय २२) आणि चंद्रसेन शिवरतन धारीया (वय २८) अशी आहेत. तिघेही सासवड येथे राहत असून मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या पथकाने वाडेगाव परिसरात सापळा रचला. संशयित एमएच १२ जीटी ६६७५ क्रमांकाच्या टेम्पोचा पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी मागील पाच ते सहा महिन्यांत लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव, आष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस आणि हिंगणगाव परिसरातील शेतांमध्ये तसेच रस्त्यालगत बसविण्यात आलेले एकूण आठ ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ७३ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या धातूच्या तारा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला मालवाहू टेम्पो जप्त केला आहे. आरोपींनी आणखी किती ठिकाणी अशाच प्रकारे चोरी केली आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

या कारवाईमुळे महावितरणच्या डीपी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, टोळीतील अन्य साथीदारांचा शोधही घेतला जात आहे.

See also  मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!