रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

३०० हून अधिक विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; आरोग्य तपासणीसोबत आवश्यक साहित्याचे वाटप

काशिनाथ शिंदे

देहूरोड : भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व, श्रीक्षेत्र देहू-देहूरोड शहर मंडल भाजपचे अध्यक्ष तथा देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. ११) देहूरोड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उपक्रमाची सुरुवात देहूगावातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिरात श्री विठ्ठल आणि संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. देहूरोड येथील सेंट जॉर्ज स्कूलमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसह संत तुकारामनगर (थॉमस कॉलनी) परिसरातील नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

आरोग्य तपासणीसोबत नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक साहित्याचेही वाटप करण्यात आले. नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री संजय भेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, राहुल कलाटे, भाजपचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, मुकुंदनाना राऊत, मदन सोनिगरा, भाजपचे माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, देहू-देहूरोड शहर मंडलचे प्रभारी शांताराम कदम, देहूरोड शहर भाजपचे माजी अध्यक्ष रवींद्र (लहुमामा) शेलार, उद्धवराव नबाजी शेलार, गुरमितसिंग रत्तू, महावीरशेठ बारलोटा, मावळ तालुका भाजपचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, अजित शेलार आणि निलेश भेगडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य तपासणी शिबिरासाठी सोमाटणे येथील स्पर्श हॉस्पिटलचे डॉ. अमित वाघ आणि देहूरोड येथील जीवनरेखा हॉस्पिटलचे डॉ. जयेश कदम यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

See also  ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता कार्यक्रम न ठेवता आरोग्यसेवेसारखा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम घडविणारा हा उपक्रम देहूरोड परिसरात चर्चेचा विषय ठरला

  • Related Posts

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    देहूगावातील वृद्धाश्रम, अनाथ आश्रमाला अन्नदान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूगाव : वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव आणि जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपत…

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    इरादापत्रांसह जुने वाहन बदलून नवीन वाहन घेण्याचीही संधी; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: परवाना बंदीमुळे रखडलेल्या ऑटोरिक्षा परवान्यांना तसेच नवीन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!