गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

देहूगावातील वृद्धाश्रम, अनाथ आश्रमाला अन्नदान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

काशिनाथ शिंदे

देहूगाव : वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव आणि जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजू, वंचित आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा उपक्रम राबवित भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व, श्रीक्षेत्र देहू-देहूरोड शहर मंडल भाजपचे अध्यक्ष तथा देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

शुक्रवारी (दि. ११) वाढदिवसाच्या दिवसाची सुरुवात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर तीर्थक्षेत्र देहूगाव येथील गेथसेम वृद्धाश्रम तसेच येलवाडी येथील वात्सल्य अनाथ आश्रमाला भेट देत शेलार यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. या उपक्रमातून वृद्ध आणि अनाथ बांधवांसोबत वाढदिवसाचा आनंद वाटून घेण्यात आला.

यानंतर माळीनगर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा संदेश देण्यात आला. वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवावर न करता तो समाजोपयोगी कार्यासाठी करण्याचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला.

या सामाजिक उपक्रमास नारायण (तात्या) पाचपांड, देहूगाव भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी राजेश टिळेकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, सरचिटणीस प्रद्युम्न टिळेकर, सचिन मराठे, सचिन काळोखे, किसान मोर्चाचे अध्यक्ष रवींद्र काळोखे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रवीण हगवणे, सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष संदीप परांडवाल, संभाजी टिळेकर, दत्ताभाऊ हगवणे, गणेश खंडागळे, स्वामी शेवकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पिसोळीतील फार्महाऊसवर काळेपडळ पोलिसांचा धडक छापा; अवैध हुक्का पार्टी उद्ध्वस्त, तब्बल ₹७५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त!

अन्नदान, सामाजिक सेवा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध उपक्रमांतून रघुवीर शेलार यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत गरजवंतांच्या सेवेत साजरा करण्यात आला.

  • Related Posts

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; आरोग्य तपासणीसोबत आवश्यक साहित्याचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व, श्रीक्षेत्र देहू-देहूरोड शहर…

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    इरादापत्रांसह जुने वाहन बदलून नवीन वाहन घेण्याचीही संधी; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: परवाना बंदीमुळे रखडलेल्या ऑटोरिक्षा परवान्यांना तसेच नवीन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!