ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

काशिनाथ शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहून कर्तृत्ववान शिक्षकांचा गौरव करण्याचा सन्मान यशदत्त काका साने (एस. साने) यांना लाभला.

विशेष आनंदाची बाब म्हणजे आपल्या प्रभागातील सावित्रीबाई फुले म्हेत्रेवस्ती शाळा क्र. ९२ येथील शिक्षिका सौ. शितल दीपक म्हेत्रे यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल यशदत्त काका साने यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देत ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वासाची शिदोरी देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचे योगदान अमूल्य आहे. ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान आहे, अशी भावना यशदत्त काका साने यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप, पालिकेचे विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सहकारी नगरसेविका संगीतानानी ताम्हाणे तसेच इतर नगरसेवक-नगरसेविका आणि मान्यवर उपस्थित होते.

See also  पुण्यात ‘भटके-विमुक्त दिना’निमित्त राज्यस्तरीय परिषदेला दणक्यात सुरुवात
  • Related Posts

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची अखेर; वयाच्या ८१व्या वर्षी निधन काशिनाथ  शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव अमृतराव…

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

      क्रेटावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’चा बनावट ठसा; व्हीआयपी सवलतीसाठी बनवाबनवी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’ असे बनावट स्टिकर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

    सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ

    सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ

    शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव

    शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव