ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची अखेर; वयाच्या ८१व्या वर्षी निधन

काशिनाथ  शिंदे

पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव अमृतराव शिर्के (वय ८१) यांचे मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

शिवाजीराव शिर्के यांनी पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ आणि फुगेवाडी ज्येष्ठ नागरिक संघ आदी संस्थांचे अध्यक्षपद भूषविले होते. विविध सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

शिर्के यांनी ‘प्रवीण प्रकाशन’ या संस्थेच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी लिहिलेल्या ‘महाराणी येसूबाई यांचा इतिहास’ या पुस्तकाला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’चा पुरस्कार मिळाला. तसेच ‘राजे शिर्के घराण्याचा इतिहास’, ‘कृष्णाकाठ ते पवनाकाठ’ हे आत्मचरित्र, ‘कालभैरव’, ‘शिरकाण’ यांसह अनेक पुस्तके आणि कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

सातारा जिल्ह्यातील उद्योजकांचा परिचय करून देणारे ‘सातारचे रत्न’ हे त्यांचे पुस्तकही विशेष गाजले. याशिवाय ‘पराचा कावळा’, ‘ही पैशाची किमया’ आदी नाटकांचे लेखनही त्यांनी केले.

शिवाजीराव शिर्के यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांचे ते वडील, तर ओबीसी कल्याण विभागाचे सहसंचालक प्रशांत शामराव शिर्के यांचे चुलते होत.

अंत्यविधी बुधवारी

शिवाजीराव शिर्के यांचा अंत्यविधी बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) सकाळी १०.३० वाजता फुगेवाडी स्मशानभूमी येथे होणार आहे.

See also  पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; रेड झोनसह प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
  • Related Posts

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहून कर्तृत्ववान शिक्षकांचा गौरव…

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

      क्रेटावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’चा बनावट ठसा; व्हीआयपी सवलतीसाठी बनवाबनवी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’ असे बनावट स्टिकर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

    सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ

    सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ

    शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव

    शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव