आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

क्रेटावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’चा बनावट ठसा; व्हीआयपी सवलतीसाठी बनवाबनवी

काशिनाथ शिंदे

पिंपरी : खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’ असे बनावट स्टिकर तसेच राष्ट्रीय प्रतीक असलेले अशोकस्तंभाचे चिन्ह लावून व्हीआयपी सवलत व आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाविरुद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमित डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी वाहतूक विभाग आणि पिंपरी पोलिसांनी रविवारी (दि. १३) रात्री गेलार्ड चौक परिसरात ही कारवाई केली.

युवराज भरत बाबर (वय २८, रा. भास्कर प्लाझा, कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अरुण रामभाऊ कोल्हे (वय ३५) यांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दिली.

पोलीस हवालदार कोल्हे हे वार्डन कुलदीप भालेराव आणि दयानंद गायकवाड यांच्यासह साई चौक व गेलार्ड चौक परिसरात वाहतूक बंदोबस्तावर होते. त्यावेळी गेलार्ड चौकाच्या दिशेने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा वाहनाच्या (एमएच १४ एमक्यू ०७२०) पुढील काचेवर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार’ असे स्टिकर लावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या स्टिकरसोबत अशोकस्तंभाचे चिन्हही लावण्यात आले होते. वाहनचालकाने सीट बेल्ट लावला नसल्याचेही आढळून आले.

संशय आल्याने पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली. त्यावेळी बाबर याने आपल्या कुटुंबातील कोणीही आमदार नसल्याचे सांगितले. टोलनाके तसेच अन्य ठिकाणी व्हीआयपी सवलत आणि आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने वाहनावर आमदाराचे बनावट स्टिकर लावल्याचे त्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी युवराज बाबर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २०५ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सावळेराम रामचंद्र छापटे करीत आहेत.

फोटो कॅप्शन :

आमदाराचे बनावट स्टिकर आणि अशोकस्तंभाचे चिन्ह लावलेल्या क्रेटा वाहनावर पिंपरी पोलिसांची कारवाई

See also  पिंपरी चिंचवड महोत्सव पुन्हा नव्या दिमाखात; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

  • Related Posts

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहून कर्तृत्ववान शिक्षकांचा गौरव…

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची अखेर; वयाच्या ८१व्या वर्षी निधन काशिनाथ  शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव अमृतराव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

    सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ

    सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ

    शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव

    शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव