मोठ्या थकबाकीदारांवर ३० सप्टेंबरनंतर जप्तीचा बडगा!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश; औद्योगिक, बिगरनिवासी व मिश्र मालमत्तांना प्राधान्य

काशिनाथ शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. ३० सप्टेंबर २०२६ नंतर मोठ्या थकबाकीदार मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर मोठ्या थकबाकी असलेल्या मालमत्तांवर प्राधान्याने कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या करवसुलीबाबत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार यांच्यासह सर्व प्रशासन अधिकारी आणि सहायक मंडलाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण, चालू वर्षातील नवीन मालमत्तांची कर आकारणी, थकबाकीदार मालमत्ताधारक तसेच फुगीर मागणी याबाबत विभागनिहाय आढावा घेण्यात आला. करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून वसुलीची कार्यवाही अधिक गतिमान करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

३० सप्टेंबरनंतर मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी, असे सांगताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी औद्योगिक, बिगरनिवासी आणि मिश्र मालमत्तांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले. थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही प्रभावीपणे राबवावी आणि विभागनिहाय नियोजन करून करवसुलीचा वेग वाढवावा, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवून नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. नवीन बांधकामांची माहिती संकलित करून पात्र मालमत्तांची तातडीने कर आकारणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली वाढविण्यासाठी विभागनिहाय नियोजन, थकबाकीदारांचा सातत्याने पाठपुरावा आणि प्रभावी करवसुली मोहीम राबविण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

See also  धारदार कोयता बाळगून दहशत निर्माण करणारा तरुण ताब्यात

कर भरा, ४ टक्के सवलत मिळवा; शेवटचे ८ दिवस

महापालिकेने ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करात ४ टक्के सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे आठ दिवस शिल्लक असून ३० सप्टेंबर २०२६ ही सवलत मिळण्याची अंतिम तारीख आहे.

आतापर्यंत महापालिकेकडे ५९२ कोटी ७४ लाख रुपयांचा मालमत्ता कर संकलित झाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी मुदत संपण्यापूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

  • Related Posts

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!